मुंबई / प्रतिनिधी 5 July 2016
मुंबईत पाऊस पडून दहा दिवस ही झाले नाही तर मुंबईतील रस्त्यांची अवस्था दयनीय झालेली आहे. पहिल्याच पावसात मुंबईतील रस्त्यांवर खड्डेच खड्डे निर्माण झाले आहेत. रस्त्यांची दाणादाण उडालेली आहे. त्यामुळे संपूर्ण मुंबईभर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. मुंबईकर या वाहतूक कोंडीने हैराण झालेले आहेत. दरवर्षी पावसात सर्व मुंबईकरांचे असेच हाल होतात. यासाठी शिवसेना भाजपा सरकार काहीही करत नाही आहे. दरवर्षीच्या या अवस्थेला हेच सरकार जबाबदार आहे. मुंबई महानगरपालिकेत शिवसेना भाजप्पाची सत्ता असून मुंबई महानगरपालिकेचे रस्त्यांचे बजेट दरवर्षी ३५०० हजार करोड आहे आणि रस्ते दुरुस्तीचे बजेट २५०० हजार करोड आहे. शिवसेना आणि भाजपा फक्त यामध्ये भ्रष्टाचार करण्यात गुंतलेले आहेत. पैसा खाण्यात ते मग्न आहेत. म्हणून मुंबई काँग्रेसने पुढाकार घेऊन खड्डयांसंदर्भात ऑनलाईन फोटो चळवळ ‘‘बोल मेरे पॉटहोल बोल’’ सुरू केली आहे.
या विषयी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम म्हणाले की, मुंबईतील सर्व नागरिकांनी आता एकत्र येऊन एक उठाव, एक चळवळ उभी करण्याची वेळ आलेली आहे. असे केल्याशिवाय शिवसेना - भाजपा सरकार जागे होणार नाही. मुंबईत जागोजागी खड्डे निर्माण झालेले आहेत. रस्त्यांच्या कामात प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे. हा एक खूप मोठा रस्ते घोटाळा आहे. हे सरकार आता तोंड लपवत फिरत आहे. सरकार म्हणते की मुंबईत फक्त ६८ खड्डे आहेत. खोटी संख्या सांगत हे लोक फिरत आहेत. म्हणून मी मुंबईकरांना आवाहन करत आहे की, सर्वांनी जिथे जिथे खड्डे दिसतील तिथले फोटो काढून आम्हाला व्हाट्स अँप, ईमेल किंवा ट्विटर करावेत. प्रत्येक नागरिकाने आपापल्या विभागातील खड्ड्यांचे फोटो आम्हाला ताबडतोब पाठवावेत, अशी मी सर्वांना विनंती करत आहे.
फोटो पाठविण्यासाठी संपर्क :-
फोटो पाठविण्यासाठी संपर्क :-
ईमेल : mumbaicongress@gmail.com
व्हाट्स अँप मोबाईल नंबर :-
96194 68962
फेसबुक :- @Mumcongress
ट्विटर :- @Mumcongress
व्हाट्स अँप मोबाईल नंबर :-
96194 68962
फेसबुक :- @Mumcongress
ट्विटर :- @Mumcongress
No comments:
Post a Comment