मुंबई, दि. 30 : नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा जलदगतीने व्हावा, यासाठी मुंबई शहर, जिल्हाधिकारी कार्यालय येथे सोमवार दिनांक 1 ऑगस्ट 2016 रोजी लोकशाही दिन आयोजित करण्यात आला आहे. यावेळी जिल्हाधिकारी व इतर शासकीय अधिकारी नागरीकांच्या तक्रारी ऐकण्यासाठी दुपारी 2 ते 3 यावेळेत उपस्थित राहणार आहेत, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने पत्रकाद्वारे कळविले आहे.
मुंबई शहर जिल्ह्यातील शासकीय/निम शासकीय कार्यालयातील अडचणी व तक्रारी संबंधातील ज्या नागरिकांना आपली निवेदने लोकशाही दिनी सादर करावयाची आहेत, त्यांनी जिल्हाधिकारी, मुंबई शहर यांना उद्देशून विहित नमुन्यातील अर्ज सादर करावा तसेच यावेळी मुळ अर्जासोबत उपस्थित रहावे. अर्जाचा विहित नमुना जिल्हाधिकारी, मुंबई शहर कार्यालयातील नोटीस बोर्डवर तसेच www.collectormumbaicity.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
लोकशाही दिनी नागरिकांनी आपली निवेदने दोन प्रतीमध्ये समक्ष येऊन सादर करावीत. तसेच अन्य व्यक्तीमार्फत पाठविलेली निवेदने स्वीकारली जाणार नाहीत. अर्जदारांनी एका अर्जात एकच तक्रार सादर करावी. एकापेक्षा जास्त तक्रारी असलेला अर्ज स्वीकारला जाणार नाहीत. याचबरोबर तक्रार/निवेदन वैयक्तिक स्वरुपाची असावीत,त्याचप्रमाणे न्यायप्रविष्ठ प्रकरणे, राजस्व/अपिल्स, सेवा व आस्थापना विषयक बाबी, विहित नमुन्यात नसणारे अर्ज व त्यासोबत आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज, तसेच विविध न्यायालयात,प्राधिकाऱ्यांकडील आणि लोकायुक्त यांच्याकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणांच्या तक्रारी स्वीकरल्या जाणार नाहीत, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.
No comments:
Post a Comment