वडाळा- चेंबुर दरम्यान अपघात, ३ ठार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

19 July 2016

वडाळा- चेंबुर दरम्यान अपघात, ३ ठार



मुंबई, दि. १९ - वडाळा चेंबूर दरम्यान चार गाड्यांचा भीषण अपघात होऊन ३ जण ठार झाले असून २ जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातामुळे ईस्टर्न फ्री वेवर वाहनांची प्रचंड कोंडी झाली असून घाटकोपरकड़े जाणारी वाहतूक अत्यंत धिम्या गतीने सुरू आहे. 
भरधाव वेगाने जाणा-या इनोव्हा गाडीतील चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी रोड डिव्हायडरवर आपटून पलीकडच्या रस्त्यावर पोहोचली. आणि त्याच वेळी समोरून येणा-या चार गाड्या इनोव्हावर आदळून भीषण अपघात घडला. या घटनेत तीन जण मृत्यूमुखी पडले असून दोघे गंभीर जखमी आहेत, त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad