मुंबई / प्रतिनिधी - दादर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन बोगस ट्रस्टींनी पडल्याने त्या ठिकाणी श्रमदानातून पुन्हा भवन उभारले जाणार आहे. यासाठी श्रमदान करण्यासाठी एका दिवसात ७ हजार लोकांनी नाव नोंदणी केल्याची माहिती डॉ. आंबेडकर भवन पुनर्बांधणी समन्वय समितीने दिली आहे.
डॉ. आंबेडकर भवन पुनर्बांधणी संदर्भात पीपल्स इम्प्रुव्हमेंट ट्रस्टचे ट्रस्टी व्ही. एस. आसवारे यांच्या उपस्थितीत २४ जुलैला एक बैठक संपन्न झाली. या बैठकीला ज. वि. पवार, अर्जुन डांगळे, नरसय्या आडाम, अशोक ढवळे, सुकुमार दामले, राम बहेती, विजय कुलकर्णी, किशोर ढमाले, प्रतिमा परदेशी, सुधीर ढवळे, मिलिंद रानडे, सुनील कदम, शैलेंद्र कांबळे, धीरज राठोड, सुजित पगारे, प्रसाद घागरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या बैठकीत तोतया ट्रस्टींनी पाडलेल्या आंबेडकर भवन समोरील कचरा श्रमदानाने उचलावा म्हणून श्रमदान मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. परंतू २९ जुलै रोजी उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार श्रमदानाचा हा उपक्रम आंबेडकर भवन येथे घेणे शक्य नसल्याने श्रमिक कार्यालय दादर येथे श्रमदानासाठी नाव नोंदणी करण्याचे जाहीर करण्यात आले. यानुसार ३० जुलै रोजी एकाच दिवसात आंबेडकरी अनुयायांनी उदंड प्रतिसाद दिल्याने एकाच दिवसात ७ हजार लोकांनी श्रमदानासाठी नाव नोंदवल्याचे डॉ. आंबेडकर भवन पुनर्बांधणी समन्वय समितीने कळविले आहे
No comments:
Post a Comment