पावसाळयात उद्भवणाऱया आजाराबाबत विद्यार्थ्यांना जनजागृतीपर प्रशिक्षण - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

27 July 2016

पावसाळयात उद्भवणाऱया आजाराबाबत विद्यार्थ्यांना जनजागृतीपर प्रशिक्षण

मुंबई - पावसाळयात उद्भवणाऱया आजाराबाबत वैद्यकीय अधिकारी (शाळा) या विभागामार्फत सन २०१६-२०१७ या शैक्षणिक वर्षातील जून  जुलै या दोन महिन्यांत एकूण १५७ शाळांमधील ८९१ शिक्षक, २०,४३६ विद्यार्थी, ६२४ पालक व २०० कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात आले.


सर्व मुख्य शिक्षकांना विभागीय सभेमध्ये स्लाईड शोव्दारे वैद्यकिय आरोग्य अधिकारी यांच्या समन्वयाने प्रशिक्षण दिले जात आहे. डेंग्यू, मलेरिया,लेप्टोस्पाईरोसिस, जुलाब व उलटया हया पावसाळयात उद्भवणाऱया आजारांसंबधी माहिती देण्यात येते. या आजारांची कारणे, लक्षणे व प्रतिबंधक उपाय याबाबत शालेय विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाते. पालक व शिक्षक सभेमध्ये पालक, शिक्षक  व शाळेतील कर्मचाऱयांना याबाबत जागरुक केले जाते. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे न घेण्याबद्दल, उपचार नेहमीच पूर्णपणे घेण्याबद्दल व इतरांपर्यंत आरोग्याचा हा संदेश प्रसारित करण्याबद्दल या सभेमध्ये मार्गदर्शन केले जाते. वैद्यकीय पथक उर्वरित शाळांना भेट देऊन प्रशिक्षणाचे काम लवकरच पूर्ण करणार आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad