मुंबई / प्रतिनिधी 1 जुलै 2016
मुंबईच्या रस्त्यावर दरवर्षी पावसाळ्यात खड्डे पड्ल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात असतात. परंतू मुंबईमधे यावर्षी रस्त्यावर कमी खड्डे पड्ल्याच्या तक्रारी आल्याचा दावा महापालिकेने केला आहे.
मुंबई महानगरपालिकेकडे 24 बाय 7 या एप्सवरून 1916 या केंद्रीय नंबरवर तसेच थेट फोन करून खड्ड्याच्या तक्रारी करण्याची मुभा आहे. 28 जून रोजी पालिकेकडे 188 तक्रारी आल्या होत्या त्यापैकी 132 तक्रारीवर कारवाई करण्यात आल्यावर 56 तक्रारी बाकी होत्या. त्यात अद्याप (1 जुलै) पर्यंत 150 तक्रारींची भर पडली असून सध्या 206 तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी 140 तक्रारीवर कारवाई करण्यात आली असून सध्या 66 तक्रारीवर कारवाई करण्याचे बाकी आहे अशी माहिती पालिका उपायुक्त सुधीर नाईक यांनी दिली.
रस्ते बनवताना 3 ते 5 वर्षे हमी घेतली जाते. अश्या हमी कालावधीमधे रस्त्यावर खड्डे पडल्यास कंत्राटदाराकडून खड्डे बुजवुन घेतले जात आहेत. अश्या कंत्राटदाराकडून दंड वसूल करण्यात येणार आहे. ज्या रस्त्यांचा हमी कालावधी संपला आहे आणि त्यावर खड्डे पडले असल्यास पालिका स्वता खड्डे बुजवत आहे. काही ठिकाणी पेव्हरब्लोकमुले खड्डे पडले आहेत अश्या ठिकाणी युद्धपातळीवर रस्ते समतोल करण्याची कारवाई सुरु असल्याचे नाईक यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment