मुंबई / प्रतिनिधी
राज्यात 1 लाख सफाई कामगारांची भर्ती करण्यात यावी, सफाईच्या कामातून ठेकेदारी पद्धत बंद करावी, वाल्मिकी समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ निर्माण करावे, इमारतीमधे काम करणाऱ्या असुरक्षित सफाई कामगारांसाठी सफाई कामगार वेल्फ़ेअर बोर्डाची स्थापना करावी, आरक्षणातून मेहतर, वाल्मीकी, रुखी, समजास 5 टक्के आरक्षण द्यावे, लाड पागे समितीची अमलबजावणीसाठी दक्षता समिती स्थापन करावी, 25 हजार घरे सफाई कामगारांना मोफत द्यावी, डॉ. आंबेडकर श्रम साफल्य आवासीय योजना सक्तीने लागू करावी त्यासाठी 15 वर्षे सेवेची मर्यादा ठेवावी, नगर पालिका महापालिकेतील सफाई कामगारांचे रिक्त पद भरण्यात यावी, पागे समितीच्या शासनमान्य सिफरासीप्रमाणे शैक्षणिक पात्रतेप्रमाणे पदोन्नती देण्यात यावी या मागण्यासाठी अखिल भारतीय सफाई मजदूर कोंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष चरणसिंह टांक, महाराष्ट्र अध्यक्ष अरुण चांगरे, मुंबई अध्यक्ष भरत सोलंकी यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानात धरणे आंदोलन करण्यात आले
No comments:
Post a Comment