मुंबई / प्रतिनिधी 5 July 2016
बेस्टच्या सेवेत चालकांची भरती करताना त्याला २१ दिवसांचे बस गाडी चालवण्याचे प्रशिक्षण दिले जाते. यात मुंबईतील सर्व मार्गाविषयी माहिती देण्यासह त्या चालकाकडून गाडी चालवून घेतली जाते. त्यांना वाहतुकीविषयीचे नियम समजावून सांगितले जातात. यानंतरही एखादा चालक बेदरकार बस गाडी चालवत असल्यास त्या चालकाला रीतसर प्रशिक्षण दिले जात असले तरी बसमुळे होणाऱ्या अपघातांची संख्या मोठी होती. अपघातांची संख्या सातत्याने वाढत असल्याने याची दखल घेत बेस्ट प्रशासनाने अपघात कमी करण्यासाठी प्रयत्न केले होते. या प्रयत्नाला यश आले असून बेस्टद्वारे होणारे अपघात निम्म्याने कमी झाल्याचे बेस्टकडून उपलबध आकडेवारीवरून दिसत आहे.
बेस्टच्या आकडेवारीनुसार २०१५-१६ या कालावधीत रोज सरासरी ३ हजार ४६६ बस गाडय़ा सोडण्यात आल्या. या बस गाडय़ा २३ कोटी ४३ लाख ९९ हजार २२ किलोमीटर चालवण्यात आल्या. यात वर्षभरात २९ मृत्यू, ७६ गंभीर अपघात, ७ गंभीर धडक, २२८ किरकोळ अपघात, १२५ किरकोळ धडकांची नोंद करण्यात आली आहे. या आकडेवारीनुसार दर १ हजार किलोमीटरमागे अपघातांची तसेच मृत्यूची संख्या शून्यात असल्याचे पाहायला मिळते आहे. बेस्टकडून चालकांना वेळोवेळी अधिक सक्षम प्रशिक्षण, मार्गदर्शन, तसेच समुपदेशन केले जात असल्याने हे प्रमाण कमी होत असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून वर्दळीच्या भागांत बेस्टचे अपघात होत असतात. वाहतूक कोंडीत अडकल्याने चालक तणावाखाली बस गाडय़ा चालवत आहेत. यात कुलाबा, वडाळा, मुंबई सेंट्रल, वरळी आणि वांद्रे या भागांत अपघाताचे प्रमाण जास्त आहे. मात्र यावर तोडगा म्हणून बस गाडय़ांचे अधिक सक्षम पद्धतीने प्रशिक्षण, मार्गदर्शन, योगासनाचे वर्ग चालकांसाठी सुरू करण्यात आले आहेत.
वर्ष बस मृत्यू जखमी
2008 - 9 3434 50 922
2009- 10 3645 42 882
2010 -11 4082 47 845
2011 -12 3923 26 840
2012 -13 3799 30 770
2013 -14 3753 31 700
2014 -15 3636 24 512
2015 -16 3466 29 465
No comments:
Post a Comment