दादर येथील बुद्धभूषण प्रेस आणि आंबेडकर भवन पाडणाऱ्यांच्या विरोधात आज भीमसैनिकांनी जिजामाता उद्यान ते विधान भवन प्रचंड मोर्चा काढला होता. हजारोंच्या संख्येने भीमसैनिक या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली मुंबई काँग्रेसनेही या मोर्चाला पाठींबा दिला.
मोर्चादरम्यान मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम म्हणाले की,आंबेडकर भवन तोडण्याच्या विरोधात जो आज मोर्चा काढला गेला त्याला मुंबई काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा आहे. लोकांचा जो राग आहे तो आता उफाळून आलेला आहे. आंबेडकर भवन आणि बुद्धभूषण प्रेस या भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या वास्तूवर कोणतीही नोटीस न देता रातोरात हातोडा चालवून ती जमीनदोस्त करण्यात आली. ही गोष्ट अतिशय निंदनीय आहे आणि आम्ही त्याचा निषेध करतो. ही वास्तू तोडण्यामागे ज्या लोकांचा हात आहे, त्यांना त्वरित अटक व्हायलाच हवी तसेच या प्रकरणाची चौकशी व्हायला हवी. त्याचबरोबर आंबेडकर भवन होते त्याच जागी पुन्हा उभे राहायलाच हवे, असे संजय निरुपम म्हणाले.
No comments:
Post a Comment