मुंबई, दि. 21 : हेल्मेट परिधान न करणाऱ्या दुचाकी वाहनचालकांना पेट्रोलपंपावर इंधन पुरवठा न करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे, अशी माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आज विधानपरिषद व विधानसभेत निवेदनाद्वारे दिली.
याबाबत माहिती देताना रावते म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाद्वारे नियुक्त केलेल्या रस्ता सुरक्षा समितीने मोटार वाहन कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहे. या कायद्यानुसार दुचाकी वाहन चालकाने व त्यासोबत बसणाऱ्या व्यक्तीने हेल्मेट वापरणे बंधनकारक आहे.
राज्यात दुचाकी वाहनचालकास हेल्मेट परिधान करणे कायद्यानुसार बंधनकारक करण्यात आले असूनही हेल्मेट परिधान न केलेल्या दुचाकी वाहनचालकांना त्यांच्या वाहनांमध्ये पेट्रोलपंपाद्वारे इंधन पुरविण्यात येते. त्यामुळे नियमभंग करणाऱ्याना प्रोत्साहन मिळत आहे. यापुढे दुचाकी वाहनचालकाने हेल्मेट परिधान न केल्यास पेट्रोलपंपावर इंधनपुरवठा न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment