मुंबई दि.26 : राज्यातील वीज ग्राहकांच्या समस्या सोडविण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी मागणी केल्यास विशेष शिबिरांचे आयोजन करुन तातडीने उपाययोजना करण्यात येतील, असे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानपरिषदेत सांगितले.
महावितरणच्या सेवेबाबत सदस्य संदीप बाजोरिया यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना ऊर्जामंत्री बावनकुळे बोलत होते. महावितरणच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबाला त्याच्या रहिवासाच्या ठिकाणी वीजजोडणी देण्याचे शासनाचे धोरण आहे. आदिवासी भागात स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सहकार्यातून शिबिराचे आयोजन करुन वीज जोडणी देण्यात येईल. तसेच नागरिकांच्या विविध तक्रारी लवकरात लवकर सोडविण्यासाठी महावितरणमार्फत ॲप तयार करण्यात आले आहे. या ॲपद्वारेदेखील ग्राहकांनी त्यांच्या तक्रारी नोंदविल्यास त्यांच्या अडचणी तातडीने सोडविण्यात येतील, असेही ऊर्जामंत्र्यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment