मुंबई / प्रतिनिधी - स्टेमआरएक्स रुग्णालयातील वैद्यकीय संचालक डॉ. प्रदीप महाजन आणि त्यांच्या स्टेम सेल उपचारांमध्ये तज्ज्ञ असलेल्या टीमने सेरिब्रल पाल्सी हा विकार असलेल्या १.४ वर्षांच्या मुलीवर उपचार केले.इनाया चव्हाण हिचा जन्म जानेवारी २०१५ मध्ये झाला. जन्म झाला त्यावेळी तिचे वजन प्रमाणापेक्षा कमी होते. तिच्या जन्मानंतरच्या पहिल्या आठवड्यात तिच्या पालकांच्या लक्षात आले की, तिची मनगटे काहीशी वाकलेली आहेत आणि पाय खालच्या दिशेकडे निर्देश करत आहेत. वयाच्या तिसऱ्या महिन्यात असे दिसले की तिच्या डोळ्यांच्या आणि मानेच्या हालचाली हिसके दिल्याप्रमाणे होत आहेत. त्यावेळी त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतला आणि डॉक्टरांनी त्यांना काही औषधे आणि पोषक सप्लिमेंट्स द्यायला सांगितली.
सहा महिन्यांची असताना तिला पहिली फीट/अपस्माराचा झटका आला. नंतर असे लक्षात आले की, तिला असे झटके दिवसातील कोणत्याही वेळी येतात. असा झटका आला असता ती पूर्ण वर्तुळाकार होत असे. त्यानंतर तिला नियमितपणे असे अपस्माराचे झटके येऊ लागले. इनायाला तिचे पाय उचलणे किंवा त्यांची हालचाल करणे जमत नव्हते आणि ती तिची कोपरे वाकवत असे आणि तिचे हात छातीला टेकवत असे. फिट्स नियमितपणे येत असल्यामुळे त्यांनी बालरोगतज्ज्ञ आणि न्यूरोलॉजिस्टचा सल्ला घेतला. याचे निदान करण्यासाठी मेंदूचा एमआरआय करावा, असे सुचविण्यात आले.
आपल्या मुलीवर योग्य उपचार कोणते असतील याचा शोध घेताना त्यांना स्टेमआरएक्स रुग्णालयातील स्टेमसेल उपचारांबद्दल समजले. अशा प्रकारच्या अनेक रुग्णांवर उपचार केलेल्या डॉ. प्रदीप महाजन यांची त्यांनी भेट घेतली. स्टेमआरएक्स रुग्णालयातील वैद्यकीय संचालक डॉ. प्रदीप महाजन म्हणाले, “इनायाची आई मला भेटायला आली तेव्हा सोबत अनेक रिपोर्ट्स आणि त्यांची मुलगी बरी होईल ही आशा घेऊन आली होती. बाळाचे वय खूपच कमी असल्याने हा एक आव्हानात्मक निर्णय होता. स्टेम सेल उपचार करण्यासाठी तिच्या परिस्थितीबाबतचे निदान करण्यात आले.
मेसेन्शिमल स्टेम सेल्समध्ये (एमएससी) स्व-पुनर्निर्मिती करण्याची, पेशींमध्ये जलद वाढ करण्याची आणि भेद करण्याची क्षमता असते. या पेशींमध्ये सापळ्यावरील टिश्यु, स्नायूंची यंत्रणा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पेशींमध्ये फरक करण्याची क्षमता असते. एमएससी मेंदूपर्यंत पोहोचतात आणि जखमेनंतर त्या अवयवाच्या कार्यात सुधारणा करतात. चेतासंस्थेत सुधारणा करण्यासाठी स्टेम सेलच्या रोपणाचे कार्य सुरू होण्यासाठी असलेल्या यंत्रणेमध्ये पेशींमध्ये बदल किंवा न्यूरोट्रॉफिक परिणाम असू शकतो. एमएससींना न्युरॉनसारख्या पेशी आणि चेताबंध पेशींमध्ये (ग्लिअल) फरक करण्यास प्रेरित करण्यात येईल. त्याचप्रमाणे विकासासाठी आवश्यक असलेल्या घटकांना मुक्त करून एमएससी अँजिओजेनेसिससाठी (रक्त पुरवठा) प्रेरित करतात, त्यामुळे जखम झालेल्या ठिकाणी रक्ताभिसरण व्यवस्थित होते किंवा पेशींची पुनर्निर्मिती करण्यासाठी अनुकूल मायक्रो एन्व्हायरोन्मेंट तयार करतात.
स्टेमआरक्समध्ये डॉ. प्रदीप महाजन यांनी तिला २१ दिवसांमध्ये सेल्युलर थेरपीची एकूण तीन सेशन्स करण्याचा सल्ला दिला. आतापर्यंत तिने तीन सेशन्समध्ये उपचार घेतले आहेत. तिचे पालक म्हणतात की, अपस्माराचा झटका येण्याचे प्रमाण प्रचंड कमी झाले आहे. ती आता आवाजाला प्रतिसाद देत आहे आणि तिच्या डोळ्यांच्या हालचालींमध्ये सुसूत्रता जाणवते. ती आता तिच्या पायांची थोडी हालचालही करू शकते. सेल्युलर थेरपीची अजून सेशन्स झाल्यावर तिच्यामध्ये अजून सुधारणा होईल, अशी अपेक्षा आहे. इनाया तिच्या विकासाच्या टप्प्यावर आहे, त्यामुळे ती उपचारांना वेगाने प्रतिसाद देत आहे.
No comments:
Post a Comment