मुंबई, दि. 28 : म्हाडाच्या इमारती आणि यातील घरे हे सुस्थितीत आणि दर्जा राखलेली आहेत. हे तपासूनच यापुढे म्हाडाची लॉटरी काढली जाईल, असे गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी विधानपरिषदेत सांगितले.
म्हाडातर्फे विकलांगासाठी काढण्यात आलेल्या कांदिवली-शिपोली येथील उच्च उत्पन्न गटातील लॉटरीमधील विजेत्या विकलांग दाम्पत्यास 70 लाख भरल्यानंतरही अत्यंत गलिच्छ टॉयलेट, तुटके वॉश बेसिन, जागोजागी खराब, गळती असलेली सदनिका देण्यात आली. याबाबत तक्रार करूनही म्हाडाकडून काहीच कारवाई होत नसल्याबाबत सदस्य भाई गिरकर यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली त्यावेळी वायकर बोलत होते.
यावेळी वायकर म्हणाले की, अशा प्रकारे लॉटरीमध्ये सुस्थितीत नसलेल्या सदनिका उपलब्ध करणाऱ्या ठेकेदारावर योग्य ती कारवाई केली जाईल तसेच लॉटरीतील घरे लागणाऱ्या विजेत्यास सुस्थितीतील घरे उपलब्ध करुन देण्याबाबत म्हाडाला आदेश दिले जातील. यापुढे निकृष्ठ दर्जाची कामे होऊ नये यासाठी म्हाडाची निकृष्ठ कामे करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असेही वायकर यांनी यावेळी सांगितले.
No comments:
Post a Comment