मुंबई / प्रतिनिधी 5 July 2016
मुंबईमधे पावसाळा सुरु झाल्यावर साथीच्या आजारानी डोके वर काढण्यास सुरु केले आहे. जुलै महिन्यात मलेरिया, डेंग्यू, लेप्टो, ग्यास्ट्रोचे रुग्ण वाढले असल्याचे पालिकेने उपलब्ध केलेल्या आकडेवारीवरुन समोर आले आहे.
मुंबईमधे पालिका रुग्णालयात 5 जुलै रोजी मलेरियाच्या 27, डेंग्यूच्या 6, लेप्टोच्या 6, ग्यास्ट्रोच्या 52, टायफाइडच्या 3 तर स्वाइनफ्लूच्या 1 रुग्णाची नोंद झाली आहे. 4 जुलै रोजी पालिका रुग्णालयात मलेरियाच्या 9, डेंग्यूच्या 2, ग्यास्ट्रोच्या 30 रुग्णांची नोंद झाली होती. मुंबईमधे पाउस सुरु झाल्या पासून जून महिन्याच्या शेवटच्या 10-12 दिवसात ग्यास्ट्रोचे 479, मलेरियाचे 482, हेपेटायसीस 166, डेंग्यूचे 153 व कॉलाराचा 1 रुग्णाची नोंद झाली होती.
No comments:
Post a Comment