नवी दिल्ली 30 : पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी उत्कृष्ट सेवा पुरविल्याबद्दल छत्रपती शिवाजी अंतरराष्ट्रीय विमानतळाला वर्ष 2014-15 चा राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
विज्ञान भवनात आज केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्यावतीने राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार 2014-15 चा वितरण सोहळा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन, केंद्रीय पर्यटन मंत्री महेश शर्मा विभाचे सचिव तसेच ज्येष्ठ अधिकारी उपस्थित होते.
राज्यातील ‘छत्रपती शिवाजी अंतरराष्ट्रीय विमानतळा’ ला देशभरातील महानगराच्या विमानतळामधून पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी उत्कृष्ट सेवा पुरविल्याबद्दल आज पुरस्कृत करण्यात आले. हा पुरस्कार छत्रपती शिवाजी अंतरराष्ट्रीय विमानतळाचे कॉरपोरेट व्यवहार विभागाचे महाव्यवस्थापक राहूल बॅनर्जी आणि एरो मार्केटींगचे उपाध्यक्ष रवीन पिंटो यांनी स्वीकारला.
छत्रपती शिवाजी अंतरराष्ट्रीय विमानतळ देशातील मध्य, दक्षिण आणि पश्चिममध्ये असणा-या 29 शहरांना जोडते. या विमानतळावरून दररोज जवळपास 190 विमानांची ये-जा होते. देश-विदेशातील 85 ठिकांणासाठी छत्रपती शिवाजी अतंरराष्ट्रीय विमानतळ प्रवाश्यांना सोयीस्कर होते. पर्यटनाचा विचार करता हे विमानतळ देश-विदेशातील पर्यटकांसाठी आवडते विमानतळ आहे.
No comments:
Post a Comment