मुंबई, दि. 20 : मुंबईतील पादचारी पुलाखालील पदपथावर झोपड्या, स्टॉल असे अनधिकृत बांधकामे हटविण्यासाठी मुंबई महानगरपालिका, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, रेल्वे प्रशासन यांची समन्वयक बैठक घेण्यात येईल, असे नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी आज विधानपरिषदेत सांगितले.
वांद्रे पूर्व येथील पादचारी पुलाखालील पदपथावर करण्यात आलेली बांधकामे हटविण्याबाबत सदस्य सर्वश्री नरेंद्र पाटील, किरण पावसकर यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना राज्यमंत्री डॉ. पाटील बोलत होते.
डॉ. पाटील म्हणाले की, या जागेवरील अनधिकृत बांधकाम हटविण्यासाठी पश्चिम रेल्वे प्रशासनामार्फत मागणी केल्यास मनुष्यबळ व यंत्रसामुग्री मुंबई महानगरपालिकेमार्फत देण्यात येईल आणि मुंबई शहरातील असे बांधकाम हटविण्यासाठी मुंबई महानगरपालिका, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, रेल्वे प्रशासन यांची एकत्रित समन्वय बैठक घेऊन इतर ठिकाणचेही अनधिकृत बांधकाम हटविण्यासाठी निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
No comments:
Post a Comment