लाल बहादूर शास्त्री मार्गावरील अनधिकृत बांधकामांवर कारवाई - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

22 July 2016

लाल बहादूर शास्त्री मार्गावरील अनधिकृत बांधकामांवर कारवाई

८० अनधिकृत बांधकामे हटविल्याने पदपथांसह रस्तेही झाले मोकळे
मुंबई / प्रतिनिधी 
बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील 'एल' विभागातील महाराष्ट्र काटा ते सुर्वे चौक या दरम्यानच्या लाल बहादूर शास्त्री मार्गावरील सुमारे ८० अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई करण्यात येऊन सदर अनधिकृत दुकाने हटविण्यात आली आहेत. परिमंडळ ५ चे उपायुक्त भारत मराठे मार्गदर्शनानुसार 'एल' विभागातील ३५ जणांच्या चमूने ही धडक कारवाई केली आहे. ही कारवाई करण्यासाठी मुंबई पोलिसांच्या २० जणांच्या चमूचे विशेष सहकार्य लाभले आहे. ही कारवाई पुढील आठवड्यात देखील सुरु राहणार आहे, अशी माहिती 'एल' विभागाचे सहाय्यक आयुक्त अजयकुमार आंबी यांनी दिली आहे.



दि. ४ जुलै रोजीच्या विभाग प्रमुखांच्या बैठकीदरम्यान तसेच दि. १८ जुलैच्या परिमंडळीय उपायुक्तांच्या बैठकीदरम्यान लाल बहादूर शास्त्री मार्गावरील अनधिकृत बांधकामे, स्टॉल्स हटविण्याच्या सूचना महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी सर्व संबधित अधिका-यांना दिल्या होत्या. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. महापालिकेच्या 'एल' विभागाद्वारे करण्यात आलेल्या कारवाई दरम्यान ३० अनधिकृत स्टॉल्स व ५० दुकाने हटविण्यात आली आहेत. या कारवाईसाठीच्या महापालिकेच्या चमूमध्ये अधिकारी, कर्मचारी व कामगार यांच्यासह ३५ जणांचा समावेश होता. तर २ जे.सी.बी., २ डंपर, ६ टेम्पो इत्यादी वाहनांचाही वापर या कारवाई दरम्यान करण्यात आला. या कारवाईमुळे लाल बहादूर शास्त्री मार्गावरील वाहतूक अधिक सुलभ व सुकर होण्यास मदत होणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad