मुंबई, दि. 26 : ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक पोलीस ठाण्याच्या बीट स्तरावर समित्या गठित करण्यात आल्या असून त्या माध्यमातून त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यात येतात. ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारींची प्राधान्याने नोंद घेण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत, असे गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत सांगितले. राज्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत सदस्य डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना ते बोलत होते.
गृहराज्यमंत्री केसरकर म्हणाले की, ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत ज्येष्ठ नागरिक सुरक्षा समिती स्थापन करण्यात येऊन समितीची आठवड्यातून एक बैठक घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. बीट स्तरावरील समित्यांमध्ये स्वयंसेवी संस्था यात प्राधान्याने ज्येष्ठ नागरिक संघांना सहभागी करुन घेण्यात आले आहे. याद्वारे ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडविण्यात येत आहेत.
No comments:
Post a Comment