मुंबई महापालिकेच्या  शंभर  जागा लढण्यासाठी सज्ज व्हा --रामदास आठवले - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

02 July 2016

मुंबई महापालिकेच्या  शंभर  जागा लढण्यासाठी सज्ज व्हा --रामदास आठवले

मुंबई दि 1 जुलै 2016 -   पुढील वर्षाच्या प्रारंभी होत असलेल्या मुंबई  महापालिकेच्या निवडणुकांत रिपब्लिकन पक्षाची ताकद दाखविण्यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने तयारीला लागावे   शिवसेना भाजप रिपाइं महायुतीने एकत्र महापालिकेच्या निवडणूका  लढाव्यात यासाठी आपण पुढाकार घेतला आहे मात्र जर सेना भाजप एकत्र येणार नाहीत तर भाजप सोबत रिपब्लिकन पक्ष निश्चित युती करेल मात्र युती   होईल तेंव्हा होईल  रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी  मुंबईतील  निवडक शंभर जागा  लढण्यासाठी  तय्यारीला लागावे असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष लोकनेते खासदार रामदास आठवले यांनी आज केले 


मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पूर्व तयारीसाठी  बांद्रा एम आय जी क्लब येथे  रिपाइंच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची  बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी  खासदार रामदास आठवले यांनी प्रमुख मार्गदर्शन केले यावेळी अध्यक्षस्थानी गौतम सोनवणे उपस्थित होते  विचारमंचावर  तानसेन  ननावरे  एस एस यादव आशाताई लांडगे अभयाताई सोनवणे सहदेव कटके विवेक पंडित   बाळासाहेब मिरजे सीद्धार्थ  कासारे एम एस नंदा वि ल मोहितआदी अनेक मान्यवर उपस्थित होते

आगामी महापालिका निवडणुकीत भाजप शिवसेना आणि रिपाइं ने महायुती करून एकजुटीने   लढावे   तसेच  तिन्ही पक्षांची महायुती झाली तर रिपाइं ला  35 जागा  देण्यात याव्यात तसेच महायुती झाली नाहीतरी रिपाइंची भाजपसोबत निश्चित युती  होणार असून त्यात रिपाइंला भाजपने 65 जागा द्याव्यात   त्यासाठी निवडक शंभर जागा लढण्याची तयारी रिपाइं कार्यकर्त्यांनी करावी असा ठराव या बैठकीत करण्यात आला अशी माहिती  रिपाइंचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे यांनी दिली आहे

आगामी महापालिकेच्या निवडणुका जिंकण्यासाठी जिल्हा आणि तालुका निहाय  निरीक्षक नियुक्त करावेत कार्यकर्ता मेळावे घ्यावेत तसेच रिपाइं तर्फे आगामी पालिका  निवडणुकीत  मुस्लिम मराठा बौद्ध आणि मातंग सह सर्व समाजाचे कर्तृत्ववान उमेदवार रिपाइंच्या तिकिटावर निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याचे निर्देश खासदार रामदास आठवले यांनी  दिले यावेळी रिपाइं चे जिल्हाध्यक्ष विवेक पवार, सो ना कांबळे, बाळासाहेब गरुड, सचिन मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad