'ऐतिहासिक आंबेडकर भवन' पाडण्यामध्ये मुख्यमंत्र्यांचाही हात - आनंदराज आंबेडकर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

12 July 2016

'ऐतिहासिक आंबेडकर भवन' पाडण्यामध्ये मुख्यमंत्र्यांचाही हात - आनंदराज आंबेडकर

मुंबई 11 july 2016 - ऐतिहासिक बुध्दभूषण प्रिंटिंग प्रेस आणि आंबेडकरी चळवळीचे केंद्र उध्वस्त करुन गुन्हे दाखल झाले असतांनाही पोलिस कोणतीच दखल घेत नाहित, मुख्यमंत्री म्हणतात आपसातला वाद आहे,मी तर म्हणतो हा आपसातला वाद नसुन हे आंबेडकर भवन पाडण्यामध्ये तुमचाही त्यात हात आहे असा गंभीर आरोप रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी सरकारवर केला. सत्तेचा माज करुन आंबेडकरी जनतेच्या विरोधात जाल तर, आंबेडकरी जनता तुम्हाला येत्या काळात खुर्चीवरुन खाली खेचल्याशिवाय राहणार नाही असा गंभीर इशारा आंबेडकरांनी दिला. आंबेडकर भवन जन आंदोलनच्यावतीने आयोजीत केलेल्या बैठकीत ते बोलत होते. 

यावेळी विचार मंचावर कोकण रत्नभूमी सामाजिक संघटनचे अध्यक्ष अशोक शेर्पेकर, विद्रोही पत्रकार तानाजी कांबळे, आंबेडकराईट बुध्दिस्ट काँसिल अॉफ डेव्हलपमेंटचे अध्यक्ष प्रमोद नाईक, इंडियन सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशनचे अध्यक्ष गजानन सिरसाट, रिपब्लिकन सेना मुंबई प्रमुख रमेश जाधव, रिपब्लिकन सेना जिल्हा अध्यक्ष भगवान साळवी, समाजभूषण उत्तमराव गायकवाड, पत्रकार दिलीप बनसोडे, रमाताई अहिरे, कवी सिद्धार्थ साळवी, राजेश शिनगारे, सुरेश आंभोरे आदी मान्यवर उपस्थित होते. बैठकीचे अध्यक्षस्थान प्रमोद नाईक यांनी भूषविले तर सुत्रसंचालन सिद्धार्थ साळवी आणि आभार प्रदर्शन अशोक कांबळे यांनी केले.

आंबेडकरी चळवळीचे केंद्रबिंदू आंबेडकर भवन आणि ऐतिहासिक बुध्दभूषण प्रिंटिंग प्रेस विध्वंशाच्या पार्श्वभूमीवर, विविध ६३ सामाजिक संघटनांच्या माध्यमातून तयार झालेल्या 'आंबेडकर भवन जन आंदोलन'च्या विद्यमाने आंबेडकर भवन येथे आयोजीत केलेल्या बैठकीला ६३ सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींसह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्र राज्याचे माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांनी भैय्यासाहेब आंबेडकर यांची नाहक बदनामी केल्याचा समाचार घेतांना तुझ्या बापांने काय केल असा प्रश्न उपस्थित करुन, भैय्यासाहेबांनी तर चैत्यभूमी उभी करुन, मुंबईत बाबासाहेबांचे पहिले स्मारक भोईवाडा येथे उभे केले, मंत्रालया समोर बाबासाहेबांचा पुतळा उभारला एवढेच नाही तर, बाबासाहेबांच्या पश्चात देशभर धम्म दिक्षेचे कार्यक्रम घेऊन, बुध्दिस्ट चळवळ वाढवली अशी अनेक कार्ये केली आहेत त्या कार्याचा आढावा घेतला. 

रत्नाकर गायकवाड यांनी खोडसाळपणा करुन, भैय्यासाहेबांना नाहक बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे. पण बाबासाहेब भैय्यासाहेबांना आपल्या सुंदर हस्ताक्षरात पत्र लिहून, माय डियर यशवंत असा उल्लेख करत असत याची आठवणही करुन दिली. आपल्यातील काही लोक बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या संस्था आणि चळवळ खिळखिळ्या करण्याचा प्रयत्न करीत आहेत अस वक्तव्य करुन, षडयंत्र करणा-यांबरोबर तसच वागल पाहिजे नाही तर आपल्याला किडी मुंग्यांसारखे चिरडून टाकतील असा धोक्याचा इशाराही त्यांनी दिला. तसेच सर्व पातळ्यांवर आंदोलन उभ केल असून, सर्व समाजाने व संघटनांनी सर्व शक्तीनिशी १९ जुलैच्या राज्यव्यापी मोर्च्यात सहभागी होण्याचे जाहिर आवाहन केले. 

यावेळी अनेक मान्यवरांनी आपले विचार व्यक्त करुन, १९ जुलै रोजी नियोजीत राज्यव्यापी मोर्च्याला सर्वांनी पाठिंबा दर्शवून, मान. प्रधानमंत्री, मान. मुख्यमंत्री, मान. राज्यपाल, मान. पोलिस आयुक्त, मान. विरोधी पक्षनेते, मान. धर्मादास आयुक्त अशा १५ मान्यवरांना ऐतिहासिक वास्तू जमीनदोस्त प्रकरणी संबंधितांवर कडक कारवाई आणि ट्रस्टी बरखास्त करण्यासंदर्भात ६३ सामाजिक संघटनांच्या माध्यमातून निवेदन देण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad