मुंबई, दि. 25 : राज्यात ऑनलाईन लॅाटरी पुन्हा सुरू करण्यापूर्वी तांत्रिक,कायदेशीर आणि सामाजिक बाबी तपासून त्याबाबत निर्णय करण्यात येईल, असे वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानपरिषदेत सांगितले.
राज्यात ऑनलाईन लॅाटरी पुन्हा सुरू करण्याबाबत सदस्य सर्वश्री जयंत पाटील, नारायण राणे, संजय दत्त, भाई जगताप, नीलम गोऱ्हे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना मुनगंटीवार बोलत होते. मुनगंटीवार म्हणाले की, राज्यात ऑनलाईन लॅाटरी बंद करण्यात आली आहे. बंद केलेली ऑनलाईन लॅाटरी पुन्हा सुरू करण्यात यावी अशी मागणी राज्यातील लॅाटरी विक्रेत्यांनी केली आहे. परंतु हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून लॅाटरीच्या तक्रारीबाबत धोरण आखण्यात येणार आहे. लॅाटरीबाबत ज्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. तसेच, आवश्यकता वाटल्यास याबाबत सीबीआयची मदत घेण्यात येईल असेही मुनगंटीवार यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment