मुंबई / प्रतिनिधी
बेस्ट उपक्रम सार्वजनिक उपक्रम असला तरी या उपक्रमातील बस चालकांना चांगले प्रशिक्षण दिले जात नसल्याने चालकांकडून रोज सिग्नल तोड़ण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात होत आहे. सिग्नल तोड्ल्याने कधीही मोठे अपघात होऊ शकतात याकडे लक्ष देवून प्रशासनाने अंकुश लावावा अशी मागणी समिती सदस्य रवि राजा यांनी केली. बेस्ट समितीत उपस्थित केलेल्या हरकतिच्या मुद्द्यावर रवि राजा बोलत होते.
बेस्टच्या बस वाह्कांकडून जानेवारी ते मे 2016 या 5 महिन्यात 530 सिग्नल तोड़ण्याच्या घटना घडल्या आहेत. यामधे 457 चालकांवर कारवाई म्हणून एक दिवस निलंबनाची कारवाई केली गेली. वडाला, ब्याकबे, वरली, सांताक्रुझ, पोयसर या डेपोमधे 20 पेक्षा जास्त तर आणिक डेपोमधे 50 हून अधिक सिग्नल तोडण्याचे प्रकार घडले आहेत. असे प्रकार थांबवण्यासाठी चालकांमधे भीती निर्माण व्हावी म्हणून वेळोवेळी चेकिंग व्हायला हवी त्यासाठी असिस्टंट ट्रांसपोर्ट अधिकारी नेमावा. व्हिजिलंस सारखा विभाग निर्माण करावा अशी मागणी रवि राजा यांनी केली. बेस्टने अपघातात मृत्युची संख्या कमी झाल्याचे सांगितले आहे. बेस्ट हां सार्वजनिक उपक्रम असल्याने प्रवासी, पादचारी तसेच इतर वाहन चालकां चा मृत्यू होणार नाही, अपघात होणार नाही यासाठी प्रशासनाने पाउले उचलावी, चालकावर अंकुश ठेवण्यासाठी डेपो म्यानेजार, सहायक असिस्टंट ट्रांसपोर्ट अधिकारी यांच्यावर जबाबदारी निश्चित करावी, चालकांना चांगले प्रशिक्षण द्यावे अश्या मागण्या रवि राजा यांनी केल्या. बेस्टमधील असे प्रकार रोखण्यासाठी परदेशाप्रमाणे बेस्ट बसच्या बाहेर क्यामेरा लावावा जेने करून अपघात झाल्यास रोकोर्डिंग पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाऊ शकते तसेच सिग्नल तोड्ल्याचे प्रकारही रोकोर्डिंग होउन त्यावर अंकुश लावता येवू शकतो असे मनसेचे सदस्य केदार होंबाळकर यांनी सांगितले. यावर महाव्यवस्थापक गैरहजर असल्याने हरकतिचा मुद्दा राखून ठेवण्याचे आदेश बेस्ट समिती अध्यक्ष मोहन मीठबावकर यांनी दिले.
No comments:
Post a Comment