बीड - देशात बौद्ध आणि मागासवर्गीयांवर होणाऱ्या अन्याय अत्याचारामुळे वातावरण तापले असतानाच बीड जिल्ह्यातील सरगावमध्ये दोन बौद्ध युवकांना मारहाण करण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे.
हे दोन्ही युवक मोटरसायकलवरून जात होते. एका गाडीला या दोन्ही युवकांनी ओव्हरटेक करून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. या युवकांच्या मोटरसायकलवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असल्याने 25 ते 30 जातीय वादी गुंडानी बेदम मारहाण करून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला. आकाश वाघमारे अणि मयुर लोखंडे अशी या दोन तरुणांची नावे असून हे दोन्ही तरुण बौध्द समाजातील आहेत.
दोघांनाही जखमी अवस्थेत माजलगाव येथिल ग्रामिण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणाची चौकशी करून दोषी लोकांवर त्वरित कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी बहुजन विकास मोर्चाचे बाबुराव पोटभरे यांनी केली आहे. दरम्यान या प्रकरणाला ३ - ४ दिवस होऊनही अद्याप एकाही आरोपीला अटक करण्यात आली नाही. पोलीस या घटनेची सविस्तर माहिती घेत आहेत, अशी माहिती उपाधीक्षक हरी बालाजी यांनी दिली आहे.

No comments:
Post a Comment