मुंबई, दि. 18 जुलै
ज्या पवित्र वास्तुमध्ये महामानव भारतत्न परमपुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य राहिले. जी वास्तु डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाकडून निधी उभारून उभी केली आहे. ती वास्तू धोकादायक इमारत म्हणून सी 1 दर्जाची घोषीत करणा-यां अधिका-याची चौकशी करा, कारवाई करण्यात यावी; अशी मागणी आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. तसेच ही वास्तु पवित्र असून ती ऐतिहासिक वारसा वास्तु म्हणून महापालिकेने जाहीर करायला हवी होती,अशी भूमिका मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी आज मांडली.
दादर येथील महामानव भारतत्न परमपुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाला आज संध्याकाळी आमदार अॅड आशिष शेलार यांनी भेट दिली. त्यांनी वास्तुची पाहणी केली तसेच रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदाराज आंबडेकर यांच्याशी संवादही साधला. यावेळी त्यांच्यासोबत भाजपा आमदार विजय भाई गिरकर,नगरसेविका समिता कांबळे, माजी नगरसेवक शरद कांबळे, विनोद कांबळे, आदी उपस्थित होते.
यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना आमदार अॅड आशिष शेलार म्हणाले की, ही वास्तु पाडण्यामध्ये राज्य सरकारचा कोणताही सहभाग नाही. या कटात सरकारचा कोणताही सहभाग नाही. उलट महामानव भारतत्न परमपुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सर्व वास्तुंचे जनतच झाले पाहिजे अशीच भूमिका सरकार आणि भाजपाची आहे. या पवित्र वास्तूलाही ऐतिहासिक वारसा वास्तु म्हणून घोषीत करून महापालिकेने जतन करण्याची गरज होती. पण संपुर्ण वास्तुला 354 ची नोटीस बजावून ती धोकादायक इमारतीच्या सी 1 दर्जामध्ये टाकण्याचा कट रचण्यात आला. या कटाशी भाजपाचा कोणताही संबध नाही. त्यामुळे अशा प्रकारची नोटीस बजावणा-या अधिका-याची चौकशी करण्यात यावी व त्यावर निलबंनाची कारवाई करण्यात यावी, अशी भूमिका घेऊन आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज भेट घेतली आहे त्याबाबत मुख्यमंत्री उचित कारवाई करतील असेही त्यांनी स्पष्ट केले.
या वास्तुवर झालेली कारवाई ही वेदना देणारी आहे. आम्ही अन्य पक्षांसारखे यामध्ये कोणतेही राजकारण करू इच्छित नाही. महामानव भारतत्न परमपुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीचे जनत करण्याचीच भूमिका सरकारची असून मागिल सरकारच्या काळापासून जो निधी डॉ. आंबेडकर भवनासाठी राखून ठेवण्यात आला होता तो चांगल्या भावनेने सरकारने देण्याचे घोषीत केले. त्यामध्ये कोणताही अन्य हेतून नाही. तसेच एफआयरमध्ये ज्यांची नावे आहेत त्यांना अटक करण्यात यावी अशीच भाजपाची भूमिका असून भाजपाची भूमिका न्यायाची असून या वास्तु बाबत जे घडले त्याचा अभ्यास करून आज आपण याबाबतची भूमिका मांडत आहोत,असेही त्यांनी सप्ष्ट केल.
No comments:
Post a Comment