मुंबई, दि. 26 : छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसरातील झोपडपट्टी पुनर्वसन ‘इन-सिटू’ पद्धतीने करण्यास केंद्र शासनाने तत्वत: मान्यता दिली आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत सांगितले.
मुंबई विमानतळालगत असलेल्या झोपड्यांचा पुनर्विकास करण्याबाबत विधान परिषद सदस्य सर्वश्री जनार्दन चांदूरकर, प्रा. जोगेंद्र कवाडे, डॉ. नीलम गोऱ्हे, विद्या चव्हाण यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती त्यास उत्तर देतांना मुख्यमंत्री बोलत होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ अधिसूचित क्षेत्राच्या विकास नियंत्रण नियमावलीमध्ये झोपडपट्टी पुनर्वसनाचे स्वतंत्र विनियम अंतर्भूत करण्यात आले आहेत. या परिसरात विमानतळ सुरक्षेच्या दृष्टीने बफर झोन म्हणून पुरेशी जागा ठेवण्यात येणार असून उर्वरित जागेत इन-सिटू पद्धतीने पुनर्वसन करण्यात येणार आहे. यासाठी झोपडपट्टीधारकांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment