एका दिवसात 36 दिवसाचा पाणी साठा
मुंबई / प्रतिनिधी - मुंबईमधे गेल्या वर्षी पाउस कमी पडल्याने नागरीकांवर 20 टक्के पाणी कपात पालिकेने लादली होती. यावर्षी मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावात चांगला पाउस पडत असल्याने पाणी कपात रद्द केली जाणार असल्याचे माहिती उपलब्ध झाली आहे.
मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलाव परिसरात चांगला पाउस पडत असल्याने 10 जुलैला 3 लाख 65 हजार 247 दशलक्ष लिटर इतका पाणी साठा जमा होता. त्यात 11 जुलैला 5 लाख 3 हजार 69 दशलक्ष लिटर इतक्या पाणी साठयाची नोंद झाली आहे. एका दिवसात तलावामधे 36 दिवसाचा पाणी साठा जमा झाला आहे. मोडक सागर तलावात 49 हजार 369 दशलक्ष लिटर, तानसा तलावात 63 हजार 794 दशलक्ष लिटर, तुलसी तलावात 13 हजार 97 दशलक्ष लिटर, अप्पर वैतरणा तलावात 40 हजार 16 दशलक्ष लिटर, भातसा तलावात 2 लाख 63 हजार 825 दशलक्ष लिटर, मध्य वैतरणा तलावात 65 हजार 456 दशलक्ष लिटर इतक्या पाणी साठ्याची नोंद झाली आहे.
मुंबईमधे गेल्यावर्षी पाउस कमी पडल्याने 20 टक्के पाणी कपात लागू केली आहे. दरवर्षी पावसाच्या पाण्याची नोंद करून तलावामधे पाणीसाठा समाधानकारक असल्यास स्थायी समितीच्या बैठकीत पाणी कपात कमी किंवा रद्द केली जाते. यावर्षी 20 - 21 जून रोजी पावसाची सुरुवात झाल्यावर 20 दिवसात तलावामधे 5 लाख दशलक्ष लिटरच्यावर पाणीसाठा जमा झाला आहे. मुंबईला दरवर्षी 14 लाख 50 हजार दशलक्ष लिटर पाण्याची गरज असली तरी 12 लाख 50 हजार दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा असला तरी वर्षभर पाणी पुरवले जाऊ शकते. सध्या पाणीसाठा समाधानकारक असल्याने आणि पावसाचा मौसम अडीच महीने बाकी असल्याने पाणी कपात रद्द केली जाऊ शकते.
No comments:
Post a Comment