रत्नाकर गायकवाड यांना पदावरून हटविण्यासाठी राज्यपालांना निवेदन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

28 July 2016

रत्नाकर गायकवाड यांना पदावरून हटविण्यासाठी राज्यपालांना निवेदन

मुंबई 28 July 2016 - रात्रीच्या अंधारात बेकायदेशीर रित्या दादर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन पाडणाऱ्या राज्याचे माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांच्यावर कारवाई करावी म्हणून शिवसेनेच्या आमदार नीलम गोऱ्हे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतली. यावेळी रत्नाकर गायकवाड यांना पदावरून हटविण्याची मागणी करण्यात आली. या शिष्टमंडळात रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर, आमदार बळीराम शिरसकर, संघराज रुपवते, अर्जुन डांगळे, प्राध्यापक व्ही. एस आसवारे, महेश भारतीय यांचा समावेश होता. आंबेडकर भवन पाडल्या प्रकरणी नियम धाब्यावर बसवणाऱ्यांवर कारवाई करण्यास सत्ताधारी भाजपा बोटचेपी भूमिका घेत असल्याने शिवसेना आक्रमक झाली आहे. १९ जुलैच्या आंबेडकर भवन संदर्भातील मोर्चावेळी आंबेडकरी जनतेसाठी शिवसेना, काँग्रेस, डावे पक्ष एकत्र आले होते. आजच्या राज्यपालांच्या भेटीदरम्यान पुन्हा एकदा शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आल्याचे दिसून आले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad