मुंबई, दि. 20 : महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियान आणि नागरी दलितेतर वस्ती सुधार योजनेचा विकास निधी बी.डी.एस. प्रणालीद्वारे वितरीत करताना काही जिल्ह्यांत तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. उर्वरित निधी वितरीत करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत, असे नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी आज विधानपरिषदेत सांगितले.
हिंगोली जिल्ह्यातील कळमनूरी नगरपरिषदेला नियोजन विभागातील कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे निधी मिळाला नसल्याबाबतचा प्रश्न सदस्य अमरनाथ राजुरकर, सुनील तटकरे यांनी उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना पाटील बोलत होते.
पाटील म्हणाले की, सन 2015-16 मध्ये हिंगोली जिल्ह्यास नागरी दलित वस्ती सुधार योजना आणि महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान (जिल्हास्तर) या दोन योजनांसाठी प्रत्येकी 2 कोटीची तरतूद होती. त्यात नागरी दलितेत्तर वस्ती सुधारणा योजनेसाठी 170 लाख तर महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानास 150 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानाचे उर्वरित 51.12 लाख निधी 31 मार्च 2016 रोजी बी.डी.एस. प्रणालीद्वारे वितरित करताना तांत्रिक अडचणीमुळे वितरित करता आला नाही. तो राहिलेला निधी वितरित करण्याचा प्रयत्न सुरु आहे, असे डॉ. पाटील यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment