मुंबई, दि. 29 July 2016 : नवी मुंबई येथील मृत स्वप्नील सोनवणे या युवकाच्या कुटुंबियांस तात्काळ न्याय देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार विशेष न्यायालयामार्फत हे प्रकरण निकाली काढण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली. विधानसभा सदस्य वर्षा गायकवाड यांनी नवी मुंबईतील सोनवणे कुटुंबियांना न्याय मिळण्यासंदर्भात औचित्याचा मुद्दा मांडला होता.
सामाजिक न्याय आणि विशेष सहाय मंत्री राजकुमार बडोले यांच्यासमवेत जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आम्ही पिडीत सोनवणे कुटुंबियांची भेट घेतली. त्यांच्या मागण्या जाणून मृत स्वप्नील सोनवणे संदर्भातील प्रकरण विशेष न्यायालयात चालवून पिडीत कुटुंबियांना तात्काळ न्याय मिळवून देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. तसेच, पिडीत कुटुंबियांना संरक्षण देण्यासंदर्भात पोलिस अधिका-यांना निर्देश देण्यात आले असल्याचेही शिंदे यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment