भाजपा गटनेत्याच्या विरोधात अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत कायदेशीर कारवाईचा इशारा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

14 July 2016

भाजपा गटनेत्याच्या विरोधात अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत कायदेशीर कारवाईचा इशारा

मुंबई : विशिष्ट समाजाच्या लोकांना पालिकेचे अधिकारी पाठीशी घालतात, अशा वादग्रस्त विधानामुळे भाजपाचे गटनेते मनोज कोटक गोत्यात आले आहेत़ अन्सारी या अधिकाऱ्याला उद्देशून हे विधान करण्यात आल्याने, कोटक यांच्याविरोधात अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत कायदेशीर कारवाईचा इशारा समाजवादी पक्षाने दिला आहे़ सर्व विरोधी पक्षांनी तसेच सत्ताधारी शिवसेनेने भाजपाविरोधात भूमिका घेतली. दरम्यान अन्सारी हे मागासवर्गीय असल्याने, कोटक यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटीअंतर्गत कारवाई होऊ शकते का याची चाचपणी सुरू आहे़ 

डम्पिंग ग्राउंडवरील डेब्रिज उचलण्याच्या मुद्द्यावर स्थायी समितीच्या बैठकीत आज चर्चा सुरू होती़ घनकचरा व्यवस्थापन खात्यातील प्रमुख अभियंता सिराज अन्सारी हे अन्सारी नावानेच महापालिकेत ओळखले जातात़ त्यांना उद्देशून कोटक यांनी वादग्रस्त विधान केल्याचा आरोप समाजवादी पक्षाने केला आहे़. कोटक यांनी आपले विधान मागे घेत, अन्सारी व संपूर्ण समाजाची विनाशर्त माफी मागावी, अशी मागणी समाजावादी पक्षाचे गटनेते रईस शेख यांनी केली आहे़ कोटक यांनी माफी न मागितल्यास, त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे़. भाजपा गटनेत्यांच्या विधानाचा निषेध करत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेने स्थायी समितीच्या बैठकीतून सभात्याग केला़.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad