मुंबई - शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांच्या हस्ते आज (दिनांक २७ जुलै, २०१६) जे. जे. रुग्णालयात ६५ प्रसूतिधारक महिला व नवजात अर्भकांना कपडय़ांचे वाटप करण्यात आले. यावेळी आमदार डॉ. निलम गोऱहे, जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने व शिव व्यापारी सेना संघटनेचे प्रमुख चिंटू शेख हे उपस्थित होते.
शिवसेना प्रणित शिव व्यापारी सेना यांच्या संकल्पनेतून माँसाहेब मीनाताई ठाकरे माता सन्मान योजना संपूर्ण राज्यभर राबविण्यात येत आहे. या योजनेचा शुभारंभ शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज सकाळी ‘मातोश्री’ येथे करण्यात आला. प्रसूतिधारक माता व नवजात अर्भकांना या योजनेच्या माध्यमातून शासकीय रुग्णालय तसेच महापालिका रुग्णालयांत कपडय़ांचे वाटप करण्यात येणार आहे.
No comments:
Post a Comment