बाजार समिती कायद्यातील बदलाबाबत शासनाचे शेतकरी व ग्राहकांना आवाहन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

10 July 2016

बाजार समिती कायद्यातील बदलाबाबत शासनाचे शेतकरी व ग्राहकांना आवाहन

मुंबई,दि.10: शेतकरी व ग्राहकांच्या हितासाठी शेतमालाच्या विपणन व्यवस्थेत स्पर्धा निर्माण करण्याच्या हेतूने शासनाने बाजार समिती कायदयामध्ये सुधारणा केली आहे.

या सुधारणांना काही घटकांचा विरोध असल्याने शेतमालाची खरेदी-विक्री व्यवस्था बाधित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शासनाने शेतमाल विक्रेते, शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या व थेट पणन परवानाधारक यांच्या सहकार्याने फळे व भाजीपाला उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही सुरु केली आहे. यादरम्यान, ग्राहकांना फळे व भाजीपाला उपलब्ध होण्यामध्ये काही प्रमाणात अडचणी येण्याची शक्यता आहे.

तरी बदलत्या शेतमाल खरेदी विक्री व्यवस्थेमध्ये सहभागी होवून शासनाच्या या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी सहकार्य करावे, असे आवाहन सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागातर्फे सर्व शेतकरी, ग्राहक व किरकोळ विक्रेत्यांना करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad