आशिष शेलारांनी केली कोट्यवधींची अफरातफर - प्रीती शर्मा-मेनन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

28 July 2016

आशिष शेलारांनी केली कोट्यवधींची अफरातफर - प्रीती शर्मा-मेनन

मुंबई : भारतीय जनता पार्टीचे आमदार आणि मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी एका कंपनीच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची अफरातफर केल्याचा आरोप आम आदमी पक्षाच्या नेत्या प्रीती शर्मा-मेनन यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला. शेलार यांची गुंतवणूक असलेल्या सर्वेश्वर लॉजिस्टिक कंपनीची सहा वर्षांत १८ कोटी ४६ लाख रुपयांची मालमत्ता कशी झाली, असा सवाल करीत ‘आम आदमी’ पक्षाच्या प्रीती मेनन यांनी शेलार यांच्या कंपन्यांची व आर्थिक उलाढालींची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अंमलबजावणी संचालनालय यासह विविध यंत्रणांमार्फत चौकशी करण्याची मागणी केली. 

मेनन यांनी अ‍ॅड्. शेलार यांच्या सर्वेश्वर, रिद्धी डीलमार्क, ऑपेरा रिअ‍ॅल्टर्स अशा कंपन्यांमधील 
गुंतवणूक, उलाढाल व व्यवहारांबाबत आक्षेप घेत आरोप केले. या कंपन्यांमधील गुंतवणूक अ‍ॅड्.
 शेलार यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रातही न दाखविल्याचे त्यांनी सांगितले. सर्वेश्वर कंपनी २०१० 
मध्ये स्थापन झाली. कोणताही व्यवसाय न करता आणि गेल्या पाच वर्षांतील वार्षिक उत्पन्न 
केवळ १०-१५ हजार रुपये असताना कंपनीकडे पहिल्याच वर्षी तीन कोटी ६० लाख रुपये समभाग
रूपाने आले आणि कर्ज व अग्रिम स्वरूपात २६ लाख रुपये आले. सहा कोटी रुपयांचे योग्य तारण 
नसलेले कर्ज पुढील वर्षी मिळाले. कंपनीची कर्जे सध्या १४ कोटी २४ लाख रुपयांची असून मालमत्ता
 १८ कोटी ४६ लाख रुपयांची आहे. याची चौकशी करण्याची मागणी मेनन यांनी केली आहे.

रिद्धी डीलमार्क या कोलकत्ता येथील कंपनीचे समभाग अ‍ॅड्. शेलार व त्यांचे खासगी सचिव प्रकाश 
पाटील यांनी विकत घेतले. या कंपनीत पहिल्या वर्षी २० लाख रुपये समभाग रूपाने गुंतवणूक झाली. 
ही रक्कम शेलार यांच्या सर्वेश्वर कंपनीत गुंतवण्यिात आली असताना त्याचा उल्लेख त्या कंपनीच्या
वित्तीय ताळेबंदात नाही. रिद्धी कंपनीच्या संचालकपदाचा उल्लेख शेलार यांच्या प्रतिज्ञापत्रात नाही. 
रिद्धी कंपनीची वार्षिक सभा २८ सप्टेंबर २०१२ रोजी कोलकत्ता येथे दुपारी बारा वाजता झाली व 
सर्वेश्वर कंपनीची बेलापूर येथे दुपारी साडेबाराला बेलापूरला झाली. ३० सप्टेंबर २०१४ रोजीही अशा दोन 
ठिकाणी वार्षिक सभा झाल्या. एकाच दिवशी व वेळेत या सभांना अ‍ॅड्. शेलार हे उपस्थित असल्याची 
नोंद कशी, असा सवालही मेनन यांनी केला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad