मुंबई 2 July 2016 - लोकलने प्रवास करायचा असेल तर प्रत्येक प्रवाशाला गर्दीचा सामना करावा लागतो. यावर उपाय म्हणून मध्य रेल्वेने रांगेचा उपाय सुचवला आहे. त्यामुळे आता लोकल पकडण्यासाठी रांगेत उभे रहावे लागणार आहे.
मध्य रेल्वेच्या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर हा उपाय राबवला जाणार आहे. सुरूवातीला हा नियम प्रथम वर्गाच्या महिला डब्यांमध्ये राबवला जाणार आहे. या नियमाचे पालन झाले नाही तर रेल्वे पोलिसांची मदत घेतली जाणार आहे. लोकलमध्ये चढतांना उतरतांना अनेक अपघात होता. यामध्ये अनेक प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे हा उपाय सुचवला आहे. यामुळे अपघात टळतील आणि रेल्वेचा प्रवास सुरक्षित होईल.
No comments:
Post a Comment