मुंबई, दि. 20 :समुद्र धूपप्रतिबंधक बंधारे बांधकामे योजना आता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आली आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत महाराष्ट्रातील समुद्रकिनाऱ्यांवरील धूप प्रतिबंधक कामांबाबत आढावा घेण्यात येईल,असे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानसभेत सांगितले.
पालघर जिल्ह्यातील वसई, पालघर आणि डहाणू तालुक्यातील समुद्रकिनाऱ्यावर धूप प्रतिबंधक बंधारे बांधण्यासंदर्भातला प्रश्न विधानसभा सदस्य पास्कल धनारे, भास्कर जाधव, वैभव नाईक, मनीषा चौधरी यांनी प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना पाटील यांनी सांगितले की, धूप प्रतिबंधक बंधारे हा विषय आतापर्यंत मेरीटाईम बोर्डाकडे होता. आता हा विषय सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे येत्या काळात सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत राज्यातील समुद्रकिनाऱ्यावर धूप प्रतिबंधक बंधारे बांधण्यासंदर्भात पाहणी करण्यात येईल. तसेच याठिकाणी धूप प्रतिबंधक बंधारे बांधण्यासाठी अंदाजपत्रक करुन तातडीने कार्यवाही करण्यात येईल.
No comments:
Post a Comment