आंबेडकर भवन उभारताना आंबेडकर कुटुंबियांवर अन्याय होता कामा नये - रामदास आठवले - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

12 July 2016

आंबेडकर भवन उभारताना आंबेडकर कुटुंबियांवर अन्याय होता कामा नये - रामदास आठवले



मुंबई, दि. 11- दादर येथील आंबेडकर भवन हे काही डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक नव्हते. बाबसाहेबांनी पीपल्स इंप्रुव्हमेंट ट्रस्टसाठी ही जागा घेतली होती. या जागी आंबेडकर भवन व्हावे हीच आमची भावना आहे. मात्र, ते उभारताना प्रकाश आंबेडकर व कुटुंबियांवर अन्याय होता कामा नये. इथे जी सतरा मजली इमारत होणार आहे तिथे आंबेडकर कुटुंबियांना प्रेस व कार्यालयासाठी सात-आठ हजार फुटांची जागा द्यावी अथवा सध्याच्या प्रेसच्या जागेचा अडतीसशे फुटांचा भूखंड त्यांच्यासाठी सोडून बांधकाम करावे, असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री आणिं रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी सोमवारी केली.
मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना आठवले यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, आंबेडकर भवनाच्या ट्रस्ट वर कोणी असावे याच्याशी आम्हाला काहीच कर्तव्य नाही. ट्रस्टींबाबत धर्मदाय आयुक्तांनीच शहानिशा करायची आहे. जे योग्य असतील त्यांच्याकडे ट्रस्टचा कारभार सोपवावा. याबाबत मी बैठक बोलावल्यास प्रकाश आंबेडकर त्याला उपस्थित राहणार नाहीत. मात्र, त्यांच्यावर अन्याय होता कामा नये अशीच आमची भूमिका आहे. या प्रश्नी पुढाकार घेऊन बैठक घेऊन मार्ग काढावा अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करणार असल्याचे आठवले यांनी सांगितले. 

आपण रामदास आठवले यांना ओळखत नाही, अशी कडवट प्रतिक्रीया प्रकाश आंबेडकर यांनी आंबेडकर भवनाच्या वादासंदर्भात बोलताना दिली होती. याबद्दल विचारले असता आठवले म्हणाले की, प्रकाश आंबेडकर जरी मला ओळखत नसले तरी बाबासाहेबांचे नातू म्हणून मी त्यांना ओळखतो. त्यांचा आदर करतो, असे आठवले म्हणाले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad