मुंबई : बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणी वॉर्ड क्ऱ १५६चे नगरसेवकपद लघुवाद न्यायालयाने बाद ठरविले आहे़ त्यांच्या जागी भाजपाचे दुसऱ्या क्रमांकाचे उमेदवार हरिश भंदिरगे यांना विजयी घोषित करण्यात आले आहे़ निवडणुकीपूर्वीच भाजपाचा आणखी एक नगरसेवक वाढला आहे़
इशाक शेख यांच्या निवडीला दुसऱ्या क्रमांकाचे भाजपाचे उमेदवार भंदिरगे यांनी आव्हान दिले होते़ न्यायालयाने भंदिरगे यांना विजयी घोषित केले़ त्यामुळे भाजपाचे संख्याबळ ३२वर पोहोचले आहे़. भंदिरगे यांना नगरसेवकपद मिळाले खरे़ मात्र पुढच्या वर्षी फेब्रुवारीदरम्यान महापालिकेची निवडणूक लागण्याची शक्यता आहे़ त्यामुळे भंदिरगे यांना विकासकामे करण्यासाठी अवघे सहा महिनेच मिळणार आहेत.
No comments:
Post a Comment