रेनवॉटर हार्वेस्टिंगबाबत पालिका उदासीन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

04 July 2016

रेनवॉटर हार्वेस्टिंगबाबत पालिका उदासीन

रेनवॉटर हार्वेस्टिंग न करणाऱ्या इमारतीना पालिका नोटिस बजावणार
मुंबई / प्रतिनिधी 4 July 2016 
मुंबईमधे गेले काही वर्षे पाउस कमी पडत असल्याने मुंबईमधे पुनर्बाँधनी करण्यात येणार्या इमारतीमधे सन 2007 पासून रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प राबविन्याचा नियम मुंबई महानगरपालिकेने केला आहे. परंतू गेल्या 9 वर्षात मुंबईमधे पुनर्बाधनी करण्यात आलेल्या इमारतीमधे रेनवॉटर हार्वेस्टिंग करण्यास बिल्डरानी दुर्लक्ष केल्याचे पालिकेने दिलेल्या आकडेवारी वरुन समोर आले आहे. दरम्यान याबाबत पत्रकारानी केलेल्या प्रश्नाच्या सरबत्ती नंतर पालिकेने अश्या इमारतीना नोटिस बजावण्यात येईल असा खुलासा करण्यात आला आहे.

मुंबईमधे कित्तेक वर्षे पाउस कमी पडत असल्याने 500 चौरस मिटरपेक्षा जास्त आकारमानाच्या भूखंडावर ज्या इमारतीची पुनर्बाधनी करण्यात येईल अश्या सर्व इमारतीत रेनवॉटर हार्वेस्टिंग सक्तीचे करण्यात आले होते. मुंबईमधे इमारतींची पुनर्बांधनी जोरात सुरु असताना रेनवॉटर हार्वेस्टिंग करण्यास मात्र टाळाटाळ केली जात होती. ही परिस्थिती लक्षात येताच तत्कालीन महापौर सुनील प्रभू यांनी 2013 -14 मधे मुंबईमधे 55 हजाराहुन अधिक इमारती उभा राहिल्या असताना रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प राबवाला जात नसल्याने याबाबत खरी परिस्थिती लोकांसमोर आणण्यासाठी श्वेतपत्रिका काढण्याचे निर्देश प्रशासनाला दिले होते. परंतू प्रशासनाने अद्यापही रेनवॉटर हार्वेस्टिंगकड़े दुर्लक्ष केले आहे.

मुंबईमधे पाउस कमी पडत असल्याने पाणी कपात लागू आहे, धरणातही पाणीसाठा समाधानकारक नसल्याने रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प का राबवले जात नाहित? पालिका असे प्रकल्प न राबवनार्या बिल्डरवर इमारतीवर काय कारवाई केली ? रेनवॉटर हार्वेस्टिंगच्या श्वेतपत्रिकेचे काय झाले ? अश्या प्रश्नांची सरबत्ती केल्यावर मुंबईत शहरात 80 पूर्व उपनगरात 600 तर पश्चिम उपनगरात 2600 इमारतीमधे रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प राबवण्यात आला आहे. मुंबईमधे 500 चौरस मिटरपेक्षा जास्त भुखंडावर पुनर्बांधनी करण्यात आलेल्या इमारती नेमक्या किती याची आकडेवारी पाहावी लागेल. जर अश्या काही इमारती असल्यास त्यावर पालिका नोटिस बजावून कारवाई करेल अशी माहिती पालिकेचे उपायुक्त सुधीर नाईक यांनी दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad