मुंबई, दि. 22 : राज्यातील सर्व जिल्हा सहकारी बँकेतील ठेवीदारांच्या ठेवींना संरक्षण दिले जाईल, असे सहकार मंत्री सुभाषदेशमुख यांनी सांगितले. मोखाडा (जि. पालघर) येथील ठाणे जिल्हा सहकारी बँकेत गैरव्यवहार झाल्याबाबतचा प्रश्न सदस्य गिरीशचंद्र व्यास, ॲड. निरंजनडावखरे यांनी विधानपरिषदेच्या प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला होता.
या प्रश्नाला उत्तर देताना देशमुख यांनी सांगितले की, राज्यातील जिल्हा सहकारी बँकेतील ठेवीदारांच्या ठेवींना संरक्षण दिले जाईल.सोने तारणासाठी स्वतंत्र व्यवस्था केली जाईल. तसेच मोखाडा (जि. पालघर) शाखेतील बनावट सोने तारण प्रकरणासंबंधी तत्कालीन बँक शाखाव्यवस्थापक, तत्कालीन शाखा हिशेबनीस, तत्कालीन बँक सुरक्षा रक्षक तसेच 22 संशयित कर्ज प्रकरणाशी संबंधित सतरा कर्जदार अशा 20व्यक्तींवर मोखाडा (जि. पालघर) येथील पोलिस स्टेशनमध्ये बँकेने 28 एप्रिल 2016 रोजी एफआयआर नोंदवून गुन्हा दाखल केला असल्याचे देशमुख यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment