मुंबई - शिवसेना भाजपा गेल्या २५ वर्षापासून महानगरपालिकेच्या सत्तेवर आहेत. पण गेल्या २५ वर्षात ते जनतेला शुद्ध पाणी देऊ शकले नाहीत. चांगले रस्ते देऊ शकले नाहीत. महापालिकेचे वार्षिक बजेट ४० हजार करोड रुपयांचे असते. पण ते त्याचा वापर करताना कधीही दिसले नाहीत. मग हे पैसे गेले कुठे? हे सर्व पैसे या शिवसेना भाजपाच्या नेत्यांनी आपल्या घशात घातले. नालेसफाई मध्ये भ्रष्टाचार, रस्ते दुरुस्ती मध्ये भ्रष्टाचार, २५०० करोड रुपये मनपाचे रस्ते दुरुस्तीचे बजेट आहे. पण ते जनतेला चांगले रस्ते देऊ शकले नाहीत. सर्व रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरलेले आहे. जिकडे तिकडे खड्डेच खड्डे आहेत. मग हे पैसे गेले कुठे? देवनार डम्पिंग ग्राउंड मध्ये घोटाळा, टॅबलेट घोटाळा, असे अनेक प्रकारचे घोटाळे रोज बाहेर येत आहेत. महागाईने जनता त्रस्त झालेली आहे. डाळींचे भाव अजूनही गगनाला भिडलेले आहेत. सर्वत्र भ्रष्टाचार सुरु आहे. जोपर्यंत आम्ही यांचे खरे स्वरूप जनतेसमोर आणत नाहीत. जोपर्यंत जनतेचे प्रश्न मार्गी लागत नाहीत तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही. आमचे भ्रष्टाचार विरोधी आंदोलन सुरूच राहील, असे मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम म्हणाले...
शिवसेना-भाजपा शासित महानगरपालिकेच्या भ्रष्ट कारभाराविरोधात आज मुंबई काँग्रेस तर्फे महापालिकेच्या २४ वॉर्ड ऑफिसमध्ये मोर्चा काढण्यात आला होता. प्रत्येक विभागातील स्थानिक आमदार, माजी आमदार, नेते, नगरसेवक / नगरसेविका, ब्लॉक अध्यक्ष, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यामध्ये सहभागी झाले होते. मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम आणि आमदार नसीम खान यांच्या नेतृत्वाखाली कुर्ला पश्चिम येथील एल वॉर्ड येथे मोर्चा काढण्यात आला होता. याप्रसंगी ते बोलत होते...
ते पुढे म्हणाले की, अशा या भ्रष्टाचारी शासनाला त्यांची जागा दाखवणे जनतेच्या हातात आहे. येणाऱ्या २०१७ च्या महापालिकेच्या निवडणुकीत त्यांनी शिवसेना भाजपा शासनाला त्यांची जागा दाखवून द्यावी. त्यांना त्यांच्या खुर्चीतून उखडून बाहेर फेकावे, असे मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम म्हणाले... या मोर्चा मध्ये मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम आणि आमदार नसीम खान यांच्या समवेत कुर्ला विभागातील स्थानिक नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते...
No comments:
Post a Comment