बलशाली महाराष्ट्रासाठी माध्यमांची साथ महत्वाची - मुख्यमंत्री - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

02 July 2016

बलशाली महाराष्ट्रासाठी माध्यमांची साथ महत्वाची - मुख्यमंत्री

मुंबई, दि. १ : समाजातील चांगले कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव हा इतरांना प्रेरणादायी ठरणारा असतो. अशा प्रेरणादायी व विधायक वातावरणातूनच समाज एकत्र येऊन नवनिर्मिती होईल. बलशाली  महाराष्ट्र घडविण्यासाठी माध्यमांची साथ महत्वाची आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज येथे केले.


एबीपी माझा या वृत्त वाहिनीतर्फे ‘माझा सन्मान पुरस्कार 2016’च्या वितरण समारंभात
फडणवीस बोलत होते. केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, अभिनेता आमिर खान, मकरंद अनासपुरे, एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर, एबीपी न्यूज नेटवर्कचे सीईओ अशोक व्यंकटरमणी आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, राज्यात नाम, पाणी फाऊंडेशन यासारख्या संस्था जलसंधारणाच्या कामात महत्त्वाचे योगदान देत आहेत. समाजातील अशा कृतीशील संस्था व व्यक्तींमुळेच राज्य दुष्काळमुक्त होण्यास मदत होईल. अशा विधायक कामांसाठी प्रेरणा देण्याचे काम ‘एबीपी माझा’कडून होत आहे, ही कौतुकास्पद बाब असल्याचे त्यांनी सांगितले.

रेल्वे मंत्री प्रभू म्हणाले की, सकारात्मक विचारांतून समाजात परिवर्तन घडते. ‘एबीपी माझा’चा हा उपक्रम प्रेरणादायी आहे.

यावेळी चित्रकार डॉ. सुधीर पटवर्धन, रिओ ऑलिम्पिकमध्ये प्रतिनिधित्व करणारी खेळाडू ललिता बाबर, वृद्धांना मोफत अन्नपुरवठा करणारे मार्क डिसोझा,संशोधक शुभा टोळे, उद्योजक हनुमंत गायकवाड, शास्त्रीय गायक महेश काळे,अभिनेत्री रिंकू राजगुरु, दिग्दर्शक नागराज मंजुळे, नाम संस्थेचे अभिनेता मकरंद अनासपुरे आणि सहकारी,  जलसंधारणात काम करणारे पाणी फाऊंडेशनचे अभिनेता अमिर खान, सत्यजित भटकळ यांचा सन्मान करण्यात आला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad