मुंबई / प्रतिनिधी - बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे एल विभाग, साकीनाका जंक्शन येथील ब्ल्यू स्टार कंपनीजवळ, कुर्ला साऊथ व कुर्ला नॉर्थ या मुख्य जलवाहिनीच्या जोडणीवरच्या ३०० मि.मी. व्यासाच्या झडपेचे दुरुस्तीचे काम प्रस्तावित आहे.
सदर काम मंगळवार, दिनांक २६ जुलै, २०१६ रोजी सकाळी ९ वाजेपासून ते बुधवार दिनांक २७ जुलै, २०१६ रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत (एकूण २४ तास) हाती घेण्यात येत आहे. सदर कामाच्या या कालावधीत एल विभाग येथील प्रभाग क्रमांक १२३ व १५० ते १६४ मधील गुरुनानक नगर,एल.बी.एस.मार्ग (महिंद्रा पार्क ते महाराष्ट्र काटा) कुर्ला स्टेशन, तकियावाड, पाईपरोड, हॉल रोड,न्यू मील रोड, ब्राह्मणवाडी, कमानी, ख्रिश्चन गांव, स्वदेशी मील रोड, वाडिया इस्टेट कसाईवाडा,कोहिनूर, काजूपाडा पाईपलाईन रोड, ९० फूट रोड, खाडी क्रमांक ३, शास्त्री नगर, जरी-मरी,साकीनाका, घाटकोपर अंधेरी लिंक रोड, कुर्ला - अंधेरी रोड, अशोक नगर, मिलींद नगर, केबीएम कंपाउंड इत्यादी या संपूर्ण विभागामध्ये पाणीपुरवठा होणार नाही. तरी सदर परिसरामधील नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून अगोदरच्या दिवशी पुरेसा पाण्याचा साठा करावा, ४८ तासाकरिता पाणी गाळून व उकळून वापरावे व पाणी काटकसरीने वापरुन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनास योग्य ते सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment