डॉ. आंबेडकरांच्या कार्याशी निगडीत मुंबईतील स्थळांच्या विकासासाठी ‘डॉ. आंबेडकर सर्किट’ उभारावे - राज्यपाल - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

03 July 2016

डॉ. आंबेडकरांच्या कार्याशी निगडीत मुंबईतील स्थळांच्या विकासासाठी ‘डॉ. आंबेडकर सर्किट’ उभारावे - राज्यपाल

मुंबईदि. 2 July 2016 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची मुंबई ही कर्मभूमी होती. चार दशके त्यांनी या भूमीत राहून कार्य केले असून, त्यांच्या स्मृती व कार्याशी निगडीत अनेक स्थळे मुंबईत आहेत. त्यामुळे मुंबईतील अशी स्थळे एकमेकांशी जोडून डॉ. आंबेडकर सर्किट’ म्हणून त्यांचा विकास करावा, असे प्रतिपादन राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी आज येथे केले.

मुंबई शेअर बाजारातील कन्व्हेशन सभागृहात कल्पना सरोज फाऊंडेशनच्या वतीने आयोजित आंबेडकर रत्न पुरस्कार वितरण सोहळ्यात राव बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकेंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) हंसराज अहिर,खासदार रामदास आठवलेआमदार नरेंद्र पवारमुंबई स्टॉक एक्चेंजचे व्यवस्थापकीय संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष चौहानफाऊंडेशनच्या अध्यक्षा कल्पना सरोजमाजी मंत्री बबनराव पाचपुते आदी यावेळी उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त अमेरिकेत राष्ट्रसंघाच्या मुख्यालयात कार्यक्रम साजरा करण्यात आला. त्या कार्यक्रमाचा समारोप आजच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमाने मुंबईत झाला.
यावेळी बेस्टचे महाव्यवस्थापक जगदीश पाटील,आयडीबीआयचे चेअरमन किशोर खरातचरणदास निखाडे,आशिष चौहानमाजी आमदार बाबूलाल बच्छडलक्ष्मी टी नरसिंहाज्योती रेड्डीडॉ. अंजली मुखर्जीवाहिनी देवीजस्टिस विनूभाई भैरवियाराहूल नार्वेकरसुबचन रामप्रकाश रवीविश्राम गमेराहूल सिंगराजलक्ष्मी रावप्रवीण निखाडेमाजी सनदी अधिकारी आर. डी. शिंदेआयूब खानकिरण सोनवणेअनिरुद्ध वनकर आदींचा यावेळी ‘आंबेडकर रत्न पुरस्कारा’ने गौरविण्यात आले.
राज्यपाल म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे संविधान निर्माते याबरोबरच पत्रकारशिक्षणतज्ज्ञअर्थतज्ज्ञ,समाजसुधारकराजकारणी आणि विधी तज्ज्ञ होते. त्यांनी पददलितांच्या हक्कांसाठी आवाज उठविला. खऱ्या अर्थाने ते 20व्या शतकातील महामानव होते. त्यांनी दलितांच्या विकासासाठी मोठे कार्य केले आहे. मात्र आजही अनेक ठिकाणी सामाजिक बहिष्कार, ऑनर किलिंग अशा घटना घडत आहेत. त्यामुळे लोकांनी एकत्र येऊन डॉ. आंबेडकर यांनी सांगितलेल्या समता,न्याय व आत्मसन्मान या तत्वानुसार समाज निर्मितीसाठी पुढाकार घ्यावा. दलित समाज बांधवांनी एकमेकांना मदत केली तरच या असमानतेपासून दूर जाता येईल.  \
समाजातील वंचितांच्या आर्थिक सामाजिक विकासाचे साधन म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या संविधानाकडे पाहिले जाते. डॉ.आंबेडकर हे व्यासंगी अर्थतज्ज्ञ होते. औद्योगिकरणामध्ये दलितांना जास्त लाभ मिळायला हवाअसे त्यांचे मत होते. त्यामुळे दलित समाजातील उद्योजकांनी नोकरीच्या संधी निर्माण करायला हव्यात. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तळागाळातील उद्योजकांसाठी विविध योजना आणून डॉ. आंबेडकर यांच्या विचारावर पाऊल टाकले आहे. प्रधानमंत्री मुद्रा योजनेमध्ये लघु उद्योजकांना सुमारे एक लाख कोटी रुपयांचे कर्ज वितरण होत असून अनेक मागासवर्गातील उद्योजक याचा लाभ घेत आहेत. त्याप्रमाणे उद्योग वाढीसाठी केंद्र शासनाने स्टार्ट अप इंडियास्टँड अप इंडिया’ ही योजना सुरू केली आहे. कल्पना सरोज फाऊंडेशन आणि दलित चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडिस्ट्रीज या संघटनांनी एकत्र येऊन तरुणांना उद्योग उभारण्यासाठी मार्गदर्शन करावे.त्यातून हे तरुण या नव्या योजनांचा लाभ घेऊ शकतील. कल्पना सरोज यांनी उद्योग क्षेत्रात कामगिरी केली असून त्यांनी दलित महिला उद्योजिकांचे चेंबर सुरू करावेअसे आवाहन श्री. राव यांनी यावेळी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे राष्ट्रनिर्माते
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले कीडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील विविध क्षेत्रात अतुलनीय कार्य केले आहे. एक माणूस एका जीवनात एवढ्या विविध क्षेत्रात काम कसे करू शकतोहे आजही आश्चर्यकारक आहे. देशाच्या निर्मितीसाठी,विकासासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले असून ते राष्ट्रनिर्माते होते. त्यांनी देशाच्या समोरील आव्हानांवर करावयाच्या उपाय योजनेचा मूलमंत्रच त्यांनी आपल्या संविधानातून जगासमोर मांडला होता. त्यांची 125 वी जयंती ही केवळ उत्सव किंवा कार्यक्रम न राहता त्यांच्या विचार तळागाळापर्यंत पोचविणे हाच खरा उपक्रम होईल. डॉ. आंबेडकर यांचे कार्य केवळ देशापुरतेच नव्हे तर वैश्विक होते. त्यामुळे या वैश्विक नेत्याचे जपानमध्ये पुतळा बसविण्यापासून ते लंडनमधील त्यांचे वास्तव्य असलेले घराचे स्मारक करण्यापर्यंतचे निर्णय राज्य शासनाने घेऊन त्यांना आदरांजली वाहिली आहे. डॉ. आंबेडकर यांचे विचार पथदर्शी असून ते समाजातील तळागाळापर्यंत पोचविण्यास राज्य शासन कटिबद्ध आहे.
लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संशोधन आजही संदर्भासाठी वापरले जाते. त्यांनी तेथे डॉ. आंबेडकर फेलोशिप सुरू करण्यास मान्यता दिली असून त्यावर राज्य शासन लवकरच निर्णय घेणार आहे. डॉ. आंबेडकर यांचे आर्थिक विचार आजच्या स्थितीत मोलाचे असून रुपयाच्या परिवर्तनापासून ते खुल्या अर्थव्यवस्थेबद्दलचे त्यांचे लिखाण आजही लागू आहेतअसेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
आंबेडकर रत्न पुरस्कार कार्यक्रम आयोजित करून कल्पना सरोज यांनी एक वेगळी अभिनव संकल्पना राबविली आहे. जीवनातील आव्हानासमोर संघटित होऊन लढण्याचे काम श्रीमती सरोज यांनी केले आहे. त्यांचे जीवन प्रेरणादायी आहेअसेही मुख्यमंत्री म्हणाले.
केंद्रीय राज्यमंत्री अहिर म्हणाले कीडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील सर्वांसाठीच कार्य केले आहे. त्यांनी नदीवर बंधारे बांधणेकामगारांसाठी कायदे तयार करणेआर्थिक स्थिती याबद्दलतचे विचार मांडले. त्यांच्या विचारांना आजही जगभरात मान्यता मिळत आहे. त्यांचे विचारानुसार कार्य करण्याचे काम कल्पना सरोज करत आहेत.
यावेळी आठवलेचौहान यांचीही भाषणे झाली. सरोज यांनी पुरस्काराबद्दल माहिती दिली. यावेळी दै. लोकधारा या वृत्तपत्राचे तसेच अमेरिकेत काढलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad