मुंबई, दि. 29 : रायगड जिल्ह्यातील खालापूर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी)साठी जमिन संपादित करताना तेथील रहिवाशांना विश्वासात घेऊनच जमिन संपादनाची कारवाई करण्यात येईल, असे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज विधानपरिषदेत सांगितले.
खालापूर (जि. रायगड) तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सातबारावरील नोंदी रद्द करण्याबाबतचा प्रश्न सदस्य सर्वश्री जयंत पाटील, सुनिल तटकरे, भाई जगताप,प्रविण दरेकर, निलम गोऱ्हे यांनी उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना देसाई बोलत होते.
देसाई म्हणाले की, मेक इन इंडिया सप्ताहामध्ये अनेक औद्योगिक करार करण्यात आले असून अनेक उद्योजक या भागात यायला उत्सुक आहेत. त्यामुळे या औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून औद्योगिक विकास आणि नवीन रोजगार निर्मिती होण्यास मदत होणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
No comments:
Post a Comment