मुंबई, दि. २६ : रेशन पुरवठ्यात पारदर्शकता येण्यासाठी याविभागाचे संगणकीकरण करणे तसेच सर्व लाभार्थ्यांना आधारक्रमांकाशी संलग्न करुन रेशन वितरणात बायोमेट्रीक प्रणालीचा वापरकरण्यावर भर देण्यात येत आहे. राज्यात पुढील साधारण ४ महिन्यातबायोमेट्रीक प्रणालीच्या आधारेच रेशनचे वितरण केले जाईल, अशीमाहिती अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांनी विधानसभेत दिली. विभागामार्फत मांडण्यात आलेल्या पुरवणी मागण्यांसंदर्भातझालेल्या चर्चेस उत्तर देताना ते बोलत होते.
ते म्हणाले की, बोगस रेशन कार्ड बंद करणे, एकाच वेळी गॅसआणि रॉकेलची दुबार सबसीडी घेणारे लाभार्थी शोधून काढून त्यांची एकसबसीडी बंद करणे यासाठी विभागामार्फत मोहीम पातळीवर कार्यवाहीकेली जात आहे. यामुळे बोगस लाभार्थी बंद होऊन खऱ्या लाभार्थ्यांनाअन्न व नागरी पुरवठा विभागाच्या योजनांचा लाभ मिळणार आहे.यासाठीच आधार कार्डाशी संलग्नीकरण तसेच बायोमेट्रीक प्रणालीच्यावापरावर भर देण्यात येत आहे, असे ते म्हणाले.
पुरवणी मागण्यांवरील चर्चेस उत्तर देताना उर्जा मंत्री चंद्रशेखरबावनकुळे म्हणाले की, राज्यातील कोणताही औष्णिक वीज प्रकल्प बंदकेला जाणार नाही. मुंबईत वीजपुरवठा करणाऱ्या चार कंपन्यांचे किमानपहिल्या १०० युनिटपर्यंतचे वीज दर समान असावेत यासाठी सध्याप्रयत्न करण्यात येत आहेत. विदर्भ, मराठवाड्यात उद्योगांना वीजदरात सवलत देण्यात आली आहे.
आदिवासी विभागामार्फत करण्यात आलेली विविध प्रकारच्यावस्तुंची खरेदी ही विहीत पद्धतीनेच करण्यात आली आहे. आदीवासीविद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या वस्तू ह्या ब्रँडेड आणि चांगल्यादर्जाच्याच दिल्या जातील, अशी ग्वाही यावेळी आदिवासी विकास मंत्रीविष्णु सावरा यांनी दिली.
सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले म्हणाले की, घरातीलएखाद्या व्यक्तीची जात पडताळणी झाली असल्यास त्याच्या रक्ताच्यानात्यातील इतर व्यक्तींना जातपडताळणीच्या संपूर्ण प्रक्रियेला पुन्हासामोरे जाता कामा नये. याबाबत मंत्रिमंडळाचाही निर्णय झाला असूनयेत्या १५ दिवसांत या तरतुदीच्या अंमलबजावणीसाठी कार्यवाही करु,असे त्यांनी सांगितले.
उद्योग मंत्री सुभाष देसाई म्हणाले की, केंद्राची मुद्रा योजनातसेच सीडबी बँकेच्या सहयोगाने राज्य शासनाने नवउद्योजकांनाप्रोत्साहन देण्यासाठी योजना सुरु केली आहे. रेमण्ड कंपनीससवलतीच्या दरात जागा देण्यात आली. पण ही कंपनी लवकरच आपलेउत्पादन सुरु करणार असून त्यामाध्यमातून खूप मोठ्या प्रमाणातरोजगाराची निर्मिती होणार आहे, असे ते म्हणाले.
No comments:
Post a Comment