आंबेडकर भवन बांधकाम ‘जैसे थे’ स्थितीत ठेवण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

30 July 2016

आंबेडकर भवन बांधकाम ‘जैसे थे’ स्थितीत ठेवण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश

मुंबई २९ जुलै २०१६ : दादर येथील जमीनदोस्त करण्यात आलेल्या ऐतिहासिक आंबेडकर भवनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर व त्यांच्या समर्थकांना प्रवेश करण्यास शुक्रवारी उच्च न्यायालयाने मज्जाव केला आहे. ‘या प्रकरणावरील सुनावणी प्रलंबित असेपर्यंत कोणीही भवनात काहीही करू नये. हे बांधकाम ‘जैसे थे’ स्थितीत ठेवण्यात यावे,’ असे निर्देश न्या. काथावाला यांनी दिले. जबरदस्तीने या भवनात कोणी शिरकाव करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधितावर थेट कारवाई करावी, असा आदेश पोलीस आयुक्तांना दिले. सोमवारी या प्रकरणी पुढील सुनवाई होणार आहे. 
दादरचे ऐतिहासिक आंबेडकर भवन पाडल्यानंतर आनंदराज आंबेडकर यांनी या प्रकरणी रत्नाकर गायकवाड व इतर ट्रस्टीवर दादर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी कोणावरही कारवाई केली जात नसल्याने भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी १९ जुलैला महामोर्चा काढून ३० जुलै पासून श्रमदान करून पुन्हा एकदा आंबेडकर भवन उभारण्याचा संकल्प केला. ३० जुलै पासून कोणतीही सरकारी मदत न घेता आंबेडकरी जनतेच्या घामाच्या पैशातून श्रमदानाने आंबेडकर भवन उभे केले जात असतानाच पीपल्स इम्प्रुव्हमेंट ट्रस्टच्या कथित ट्रस्टीनी उच्च न्यायालयात प्रकाश आंबेडकर व त्यांच्या समर्थकांवर दावा दाखल केला आहे. या अर्जावर न्या. एस. जे. काथावाला यांच्यापुढे सुनावणी होती. ‘या प्रकरणावरील सुनावणी प्रलंबित असेपर्यंत कोणीही भवनात काहीही करू नये. हे बांधकाम ‘जैसे थे’ स्थितीत ठेवण्यात यावे,’ असे निर्देश न्या. काथावाला यांनी दिले. सोमवारी या प्रकरणी पुढील सुनवाई होणार आहे. 
ट्रस्टने केलेल्या अर्जानुसार, आंबेडकर भवनाच्या आवारात असलेली तीन बांधकामे मोडकळीस आल्याने ती पाडण्यात यावीत, अशा आशयाची नोटीस महापालिकेने १ जून रोजी ट्रस्टला बजावली. महापालिकेने बजावलेल्या नोटीसनुसार, ट्रस्टने २५ जून रोजी आंबेडकर भवन पाडण्याचे काम सुरू केले. आंबेडकर भवनात तीन बांधकामे होती. ही तिन्ही बांधकामे पाडण्यात आली आहेत. त्यापैकी एका बांधकामाचे मालक प्रकाश आणि आनंदराज आंबेडकर आहेत. प्रस्तावित १७ मजली बांधकामामध्ये प्रकाश आणि आनंदराज आंबेडकर यांना कामकाज करण्याची परवानगी दिली जाईल, असेही ट्रस्टने स्पष्ट केले. ट्रस्टच्या वतीने एड. संतोष सांजकर यांनी तर प्रकाश आंबेडकर यांच्या वतीने एड. संघराज रुपवते यांनी न्यायालयात बाजू मांडली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad