मुंबई / प्रतिनिधी 3 July 2016
मुंबईमध्ये गेले 10 ते 12 दिवस पावसामुळे रस्तावर, रेल्वे रुळावर अनेक ठिकाणी पाणी साचण्याचे प्रकार घडत आहेत. मुंबईत पाणी साचत असताना मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये मात्र पाऊस समाधान कारक पडत नव्हता. यामुळे मुंबईकर नागरिक चिंताग्रस्त असतानाच गेल्या दोन दिवसात तलाव क्षेत्रात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. यामुळे तलावांमधील पाणीसाठा वाढू लागला आहे.
1 जुलै रोजी तलावामधे 1 लाख 10 हजार 619 मिलीलिटर पाण्याचा साठा जमा होता. 2 जुलैला 1 लाख 19 हजार 259 मिली लिटर इतक्या पाण्याच्या साठ्याची नोंद झाली होती. 3 जुलै रोजी सकाळी 6 वाजता 1 लाख 57 हजार 46 7 मिलीलिटर इतक्या पाणी साथ असल्याची नोंद झाली आहे. तलाव क्षेत्रात समाधानकारक पाऊस पडत असल्याने एका दिवसात ३८ हजार २०८ मिलीलिटर इतका पाणी साठा वाढला आहे. 3 जुलै रोजी सकाळी 6 वाजताच्या नोंदी प्रमाणे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मोडक सागर तलावात 78.00 मिलीलिटर, तानसा तलावात 97.60 मिलीलिटर, विहार तलावात 207.00 मिलीलिटर, तुलसी तलावात 194.00मिलीलिटर, अप्पर वैतरणा तलावात 64.00 मिलीलिटर, भातसा तलावात 163.00 मिलीलिटर तर मध्य वैतरणा तलावात 86.60 मिलीलिटर पावसाची नोंद झाली आहे. मुंबईला दररोज 3750 दशलक्ष लिटर इतके पाणी लागते. 2 जुलैला पडलेल्या पावसाने एका दिवसात 10 दिवसाचा पाणी साठा वाढला आहे.
धरणातील पाणी साठा 3 जुलै 2016 सकाळी 6 वाजता
तलाव दशलक्ष लिटर पाऊस (मिलिमीटर)
मोडक सागर 15144 78.00
तानसा 28829 97.60
विहार 10368 207.00
तुलसी 5937 194.00
अप्पर वैतरणा 0 64.00
भातसा 68855 163.00
मध्य वैतरणा 28327 86.60
तानसा 28829 97.60
विहार 10368 207.00
तुलसी 5937 194.00
अप्पर वैतरणा 0 64.00
भातसा 68855 163.00
मध्य वैतरणा 28327 86.60
एकूण 1,57,467 दशलक्ष लिटर
(मागील वर्षी याच दिवशी पाण्याचा साठा 329855 दशलक्ष लिटर इतका होता)
No comments:
Post a Comment