मुंबई, दि.1 जुलै : राजभवन येथील ‘मयूर विहार’ चे उद्घाटन राज्यपाल चे. विद्यासागर राव व उद्योगपती रतन टाटा यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच यावेळी‘मयुर विहार’च्या प्रांगणात राज्यपाल चे. विद्यासागर राव व उद्योगपती रतन टाटा यांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आली. यावेळी ‘मयुर विहार’ ची पाहणी राज्यपाल चे विद्यासागर राव व उद्योगपती रतन टाटा यांनी केली.
मायवेट या संस्थेचे सचिव डॉ. युवराज कागेथर, अध्यक्षा डॉ. मधुरिता गुप्ता,टाटा ट्रस्टचे ज्युबिने, मायवेट तसचे टाटा ट्रस्टचे अधिकारी व कर्मचारी, राजभवन येथील अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. टाटा ट्रस्ट व मायवेट ट्रस्ट यांच्या योगदानातून राजभवन येथील ‘मयुर विहारची’ स्थापना करण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment