मुंबई, दि. 14 : मुंबई व ठाणे शिधावाटप क्षेत्रातील शिधापत्रिका धारकांसाठी जुलै, 2016 महिन्याकरिता 867 क्विंटल साखर नियतनासाठी मंजूर करण्यात आली आहे. शिधावाटप क्षेत्रातील अ, ड, ई, फ, व, ग या परिमंडळ क्षेत्रात असणाऱ्या दारिद्र्य रेषेखालील एकूण 1 लाख 83 हजार 717 शिधापत्रिकाधारकांना प्रति व्यक्ति 500 ग्रॅम प्रमाणे एकूण 86 हजार 700 किलो साखरेचे नियतन मंजूर करण्यात आले आहे. ग्राहकांना नियंत्रित साखरेचा संपूर्ण कोटा मासिक परिमाणात घेता येणार असून, विक्रीचा दर प्रतिकिलो 13.50 रु. असा राहील.
शासकीय भिवंडी गोदामात साखरेचा पुरवठा केल्यानंतर परिमंडळ कार्यालयांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील अधिकृत शिधावाटप दुकानदारांना मंजूर केलेल्या नियंत्रित साखरेची दोन दिवसात उचल करुन शिधापत्रिकाधारकांना उपलब्ध करुन द्यावी. तसेच मुदतीमध्ये नियंत्रित साखरेची उचल न करणारी अधिकृत शिधावाटप दुकाने निलंबित करुन त्यांच्याविरुध्द खातेनिहाय चौकशी प्रस्तावित करुन त्याविषयीचा अहवाल कार्यालयास दरमहा पाठवावा, असे निर्देश नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, मुंबई यांनी पत्रकाद्वारे दिले आहेत.
No comments:
Post a Comment