मुंबई / प्रतिनिधी 4 July 2016
मुंबईच्या रस्त्यावर खड्डे पड्ल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात असतात. परंतू मुंबईमधे यावर्षी रस्त्यावर कमी खड्डे पड्ल्याच्या तक्रारी आल्याचा दावा महापालिकेने केला आहे. 2 जुलै पर्यंत खड्यांच्या फ़क्त 60 तक्रारी बाकी असल्याचे उपायुक्त सुधीर नाईक यांनी सागितले.
मुंबई महानगरपालिकेकडे 24 बाय 7 या एप्सवरून 1916 या केंद्रीय नंबरवर तसेच थेट फोन करून खड्ड्याच्या तक्रारी नागरिक करत असतात. 28 जून रोजी पालिकेकडे 188 तक्रारी आल्या होत्या त्यापैकी 132 तक्रारीवर कारवाई करण्यात आल्यावर 56 तक्रारीवर कारवाई करण्याचे बाकी होते.
1 जुलै रोजी 150 तक्रारी प्राप्त झाल्यावर एकूण 206 तक्रारींची नोंद पालिकेकडे झाली होती. त्यापैकी 140 तक्रारीवर कारवाई करण्यात आली असून 66 तक्रारीवर कारवाई करण्याचे बाकी होते.
त्यात पुन्हा 2 जुलै रोजी 218 तक्रारी प्राप्त झाल्यामुले पालिकेकडे एकूण 284 खड्यांच्या तक्रारी नोंद झाल्या. 284 पैकी 224 तक्रारीवर कारवाई करण्यात आली असून फ़क्त 60 तक्रारींवर कारवाई करण्याचे बाकी असल्याचे पालिका उपायुक्त सुधीर नाईक यांनी सांगितले.
रस्ते बनवताना 3 ते 5 वर्षे हमी घेतली जाते. अश्या हमी कालावधीमधे रस्त्यावर खड्डे पडल्यास कंत्राटदाराकडून खड्डे बुजवुन घेतले जात आहेत. अश्या कंत्राटदाराकडून दंड वसूल करण्यात येणार आहे. ज्या रस्त्यांचा हमी कालावधी संपला आहे आणि त्यावर खड्डे पडले असल्यास पालिका स्वता खड्डे बुजवत असल्याचे नाईक यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment